Aurangabad: विनामास्क फिरताय? तुमचे वाहन Black list मध्ये जाऊ शकते, वाचा किती वाहनधारकांना नोटीस?

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी शहरात कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. शहरात तुम्ही दुचाकी किंवा चारचाकीतून विनामास्क फिरला असाल तर कदाचित तुमचे वाहन ब्लॅकलिस्ट झालेले असू शकते.

Aurangabad: विनामास्क फिरताय? तुमचे वाहन Black list मध्ये जाऊ शकते, वाचा किती वाहनधारकांना नोटीस?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 11:54 AM

औरंगाबादः वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमांमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे शहरात तुम्ही दुचाकी किंवा चारचाकीतून विनामास्क फिरला असाल तर कदाचित तुमचे वाहन ब्लॅकलिस्ट झालेले असू शकते. कारण आरटीओ कार्यालयाने विनामास्क फिरणाऱ्या 1875 चालकांचे वाहन ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे.

कशी होतेय कारवाई?

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. मात्र आपली जबाबदारी न समजता सर्रास विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. शहरात अशा प्रकारे विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांचे फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. विनामास्क वाहनधारकांविरुद्ध महापालिकेच्या पथकाकडून फोटो काढण्यात येत आहेत. ते फोटो आरटीओ कार्यालयाच्या मेल आयडीवर पाठवले जात आहेत. त्यानंतर वाहन चालकांना ई-चालान पाठवण्यात येते.

दंड भरला नाही तर….

– या वाहनधारकांना टॅक्स, पीयूसी, इन्शुरन्स फिटनेस करता येणार नाही. – एवढेच नव्हे तर वाहन मालकाला वाहन विक्री करता येणार नाही. – ई चालान पाठवण्यात आलेल्या वाहनधारकांनी आलेल्या दंडाची रक्कम त्वरित भरली तर त्यांचे वाहन ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून वाचू शकते. आतापर्यंत 1875 वाहने ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहेत.

इतर बातम्या-

लोकल प्रवासावर निर्बंध आणणार?, गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली; कोणत्याही क्षणी घोषणेची शक्यता

Pushpa BO Collection : ‘पुष्पा’चा दमदार तिसरा आठवडा, अजूनही बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवतोय अल्लू अर्जुनचा चित्रपट!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.