AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

koyta gang : पुणे शहरात कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ, मध्यरात्री मुलांना धमकवत…

Pune koyta gang : पुणे शहरात कोयता गँगकडून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना कोयता गँगने धमकवले. या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

koyta gang : पुणे शहरात कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ, मध्यरात्री मुलांना धमकवत...
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 26, 2023 | 11:47 AM
Share

रणजित जाधव, पुणे : कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांच्या (Crime News) धडक कारवाया सुरु आहेत. या गँगचा म्होरक्यासह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. काही जणांवर मकोका लावण्यात आला आहे. काही जणांना हद्दपार करण्यात आले आहे. कोयताची विक्री करताना आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. या सर्व उपायानंतरही आता पुन्हा कोयता गँगने डोकेवर काढले आहे. आता खेळणाऱ्या मुलांना धमकवण्याचा प्रकार कोयता गँगने केला आहे.

कुठे केला प्रकार

पुण्यात कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ घातला आहे. कारसह दुचाकी वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोयता गँगने केला आहे. पुण्यात कोयता गँगने पुन्हा एकदा दहशत माजवली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हातात कोयते घेत प्रचंड दहशत माजवली. इतकेच नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना धमकावत त्यांच्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार बिबवेवाडीतील संत निरंकारी सत्संग भवनच्या समोर 24 मे च्या मध्यरात्री घडला.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

पोलिसांनी याप्रकरणी बाळू बाबू पवार, अभि वाघमारे, विशाल उर्फ नकट्या पाटोळे, डुई त्याच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अंकित भैरू प्रसाद सैन यांनी तक्रार दिली आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाळांमध्ये समुपदेशन

कोयता गँगकडे भाई-दादांचा रुबाबामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहे. यामुळे पोलिसांनी शाळांमध्ये समुपदेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2022 मध्ये 303 गुन्ह्यांत 476 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यापैकी 42 मुलांचा मागे कोणत्या अन् कोणत्या गुन्हेगारांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, गंभीर दुखापत असे गुन्हे या मुलांवर दाखल होते.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच