प्रेम पडले महागात, युवकाच्या बहिणीचे अपहरण करुन विवस्त्र व्हिडिओ सोशल मीडियावर

| Updated on: Feb 03, 2023 | 3:25 PM

तरुणीस एका युवकाने पळवून नेले अन् तिच्याशी लग्न केले. यानंतर काही जणांनी त्या युवकाच्या बहिणीचे अपहरण केले. तिला डांबून ठेवले.

प्रेम पडले महागात, युवकाच्या बहिणीचे अपहरण करुन विवस्त्र व्हिडिओ सोशल मीडियावर
Follow us on

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांकडून (Pune Police) करण्यात येणाऱ्या धडक कारवाईनंतरही कोयता गँगची दहशत सुरु आहे. हवेत गोळीबार करण्याचे प्रकार झाले. आता मानवतेला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. प्रेम प्रकरणातून मुलीला पळवल्यामुळे तरुणाच्या बहिणीला मोठा अनर्थ भोगावा लागला. प्रेमप्रकरणातून तरुणीला पळवून नेल्याने तरुणाच्या बहिणीचे अपहरण केले. तिली दोन दिवस डांबून ठेवले. बेदम मारहाण केली. त्यानंतर विवस्त्र करुन खोलीत डांबून ठे‌वले. शेवटी मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. हे चित्रीकरण सोशल मीडियावर टाकण्यात आले.

काय घडला प्रकार

नंदकुमार मोटे याच्या नात्यातील तरुणीस एका युवकाने पळवून नेले अन् तिच्याशी लग्न केले. यानंतर माटे व इतरांनी तक्रारदार महिलेच्या बहिणीचे अपहरण केले. त्यांना त्या तरुणाचा पत्ता विचारलो. तो कुठे गेला आहे, याची विचारणा केली. परंतु दोघांनी ठावठिकाणी सांगितला नाही. यामुळे संतापलेल्या आरोपींनी दोघांना गजाने मारहाण केली. त्यांना दोन दिवस डांबून ठेवले. तक्रारदार महिलेच्या बहिणीस विवस्त्र करून तिचे मोबाइलवर चित्रीकरण केले. चित्रीकरण सोशल मीडियावर टाकले.

हे सुद्धा वाचा

सात आरोपींवर गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणी सात जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यात नंदकुमार माटे, सुंदराबाई माटे, आरती पिंपळे, बाळासाहेब पिंपळे, सागर जगताप, श्रीराम गोसावी (सर्व रा. उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) यांचा समावेश आहे.

पुण्यात गुन्हेगारी वाढली

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यात सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँगकडून दहशत माजवली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

शाळांमध्ये समुपदेशन

भाई-दादांचा रुबाबामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहे. यामुळे पोलिसांनी शाळांमध्ये समुपदेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2022 मध्ये 303 गुन्ह्यांत 476 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यापैकी 42 मुलांचा मागे कोणत्या अन् कोणत्या गुन्हेगारांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, गंभीर दुखापत असे गुन्हे या मुलांवर दाखल होते.