AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : घरात नकारात्मक ऊर्जा वाढतच चाललीये? मग घराच्या मुख्य दरवाजावर लावा फक्त या दोन वस्तू

वास्तुशास्त्राप्रमाणेच फेंगशुई हे देखील एक शास्त्र आहे, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फेंगशुईला चीनी वास्तुशास्त्र म्हटलं जातं. फेंगशुई देखील सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन प्रमुख घटकांवर कार्य करते.

Feng Shui : घरात नकारात्मक ऊर्जा वाढतच चाललीये? मग घराच्या मुख्य दरवाजावर लावा फक्त या दोन वस्तू
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 6:29 PM
Share

अनेक जण वास्तुशास्त्रालाच फेंगशुई असं म्हणतात, पण सर्वप्रथम या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे वास्तुशास्त्र आणि फेंगशुई यामध्ये फरक आहे. वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोन्ही शास्त्राचा मुलाधार एकच असल्यामुळे हे दोन्ही शास्त्र सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा याच मुलाधारावर कार्य करत असल्यामुळे दोन्ही शास्त्रामधल्या फरकाची रेषा ही पुसट होते. अनेकजण तर फेंगशुईला चीनी वास्तुशास्त्र असं देखील म्हणतात. हे काही अंशी खरं देखील आहे, कारण वास्तुशास्त्रात जे उपाय सांगितले आहेत, त्यातील काही उपाय हे फेंगशुईमध्ये देखील सांगण्यात आले आहेत. मात्र तरी देखील फेंगशुई आणि वास्तुशास्त्रामध्ये काही प्रमाणात फरक आढळून येतो. अनेकदा असं होतं की, घरात नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढते, त्याचा त्रास आपल्याला होतो. अशावेळी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी फेंगशुईमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

फेंगशुई शास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला चीनी कॉईन अडकवले तर ते फेंगशुईनुसार अत्यंत शुभ मानलं जातं. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी की त्यासाठी लाल रंगाचाच दोरा वापरावा. तुम्ही एखाद्या लाल रांगाच्या दोऱ्यामध्ये ओवून या चीनी कॉइनची माळ जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला लावली तर ते अतिशय शुभ मानलं जातं. तुम्ही दरवाज्या बाहेरील किंवा आतील अशा कोणत्याही बाजुने ही माळ लावू शकता. जर माळ नसेल लावायची तर तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कापडामध्ये ही नाणी बांधून घराच्या मुख्य दरवाजाच्या वर अडकवू शकता. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होऊन घरात आर्थिक समृद्धी, शांतता आणि घराची भरभराट होते, असं मानलं जातं.

तुम्ही तुमच्या घरात विंड चाइम पण लावू शकता, घराच्या मुख्य दरवाजावर विंड चाइम लावल्यामुळे हवेमुळे यातून निर्माण होणारा ध्वनी तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो, असं फेंगशुईमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला होणारा त्रास दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?