AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिचं लग्न ठरलं होतं, अचानक तो आला अन्… पुण्यात पुन्हा रक्ताचा खेळ, नेमकं काय घडलं?

पुण्यातील चंदननगरमध्ये एका माथेफिरू प्रियकराने दुसऱ्याशी लग्न ठरल्याच्या रागातून २२ वर्षीय उजालादेवी दोहरेची हत्या केली. मॉलमध्ये एकत्र काम करणाऱ्या आरोपी दिलीप राठोडला पोलिसांनी अटक केली असून पुण्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

तिचं लग्न ठरलं होतं, अचानक तो आला अन्... पुण्यात पुन्हा रक्ताचा खेळ, नेमकं काय घडलं?
Looteri Dulhan
| Updated on: May 08, 2026 | 8:25 AM
Share

राज्यातील गुन्हेगारीच्या आणि अत्याचाराच्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता प्रेमसंबंधांतील दुराव्यातून आणि रागाच्या भरात माणसाचा संयम सुटल्याने किती टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते, याचा प्रत्यय पुण्यातील चंदननगर भागात आला आहे. आपल्या प्रेयसीचे लग्न दुसऱ्याशी ठरल्याचे सहन न झाल्याने एका तरुणीने तरुणाचा प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. दिलीप राठोड असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याने उजालादेवी दोहरे या २२ वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला केला. दुर्दैवाने, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उजालादेवीचा मृत्यू झाला. यामुळे एका सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणीचा शेवट रक्तरंजित झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत उजालादेवी आणि आरोपी दिलीप हे दोघेही पुण्यातील एका नामांकित शॉपिंग मॉलमध्ये कामाला होते. कामाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. ही ओळख मैत्रीत बदलली आणि पुढे त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, उजालादेवी काही दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी गेली होती. तिथे तिच्या पालकांनी तिच्यासाठी लग्नाचे स्थळ शोधले. तिचा विवाह निश्चित केला.

उजालादेवीने ही माहिती दिली तेव्हा दिलीपला मोठा धक्का बसला. त्याने तिला हे लग्न मोडण्यासाठी वारंवार दबाव टाकला. मात्र कौटुंबिक निर्णयापुढे उजालादेवी ठाम राहिली. याच रागातून दिलीपच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली होती.

यानंतर २९ एप्रिलला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दिलीप उजालादेवी राहत असलेल्या चंदननगर येथील घरात गेली. तेव्हा दिलीप तिथे पोहोचला. त्या दोघांमध्ये लग्नाच्या विषयावरून पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात दिलीपने त्याच्याकडे असलेल्या धारदार चाकूने उजालादेवीच्या गळ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर सपासप वार केले. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावून येईपर्यंत आरोपी तिथून पसार झाला होता.

उपचारादरम्यान मृत्यू

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उजालादेवीला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करून तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, जखमा खोल असल्याने आणि अतिरक्तस्रावामुळे तिची प्रकृती खालावत गेली. अखेर उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने तपास पथके रवाना केली होती.

पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपी दिलीप राठोड याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे पुण्यातील आयटी आणि व्यावसायिक परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?