पुण्यातील चांदणी चौकातील पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद

पुण्यातील चांदणी चौकातील पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.हा पूल लवकरच पाडण्यात येणार आहे.

पुण्यातील चांदणी चौकातील पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद
| Updated on: Sep 13, 2022 | 8:29 AM

पुणे : पुण्यातील (Pune) चांदणी चौकातील पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. चांदणी चौकातील (Chandni Chowk) वाहतुक कोंडीला कारणीभूत ठरणारा हा पूल लवकरच पाडण्यात येणार आहे. त्यापूर्वी प्रायोगिक तत्वावर इथल्या वाहतुकीत बदल करण्यात आलेत. आजपासून या पुलावरची वाहतूक करण्यात येणार बंद आहे. त्यामुळे कोथरुड किंवा सातारा रस्त्यावरुन बावधन, पाषाणकडे जाण्यासाठी किमान दिड किलोमीटरचा वळसा घेऊन मुळशीकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर उतरावे लागणार आहे. तेथून डावीकडे वळून नागरीकांना बावधन, पाषाणकडे जाता येईल.