‘हू इज धंगेकर’ विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यांसाठी रवींद्र धंगेकर यांची अनोखी चाल

| Updated on: Mar 28, 2023 | 3:22 PM

पुणे कसबा पेठेतील पोटनिवडणूक प्रचारात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी 'हू इज धंगेकर' असा प्रश्न प्रचार सभेतून विचारला होता. त्याला मतदारांनी उत्तर दिले. आता रवींद्र धंगेकर यांनी अनोखी चाल खेळली आहे. यामाध्यमातून ते आपली ओळख करुन देणार आहे.

हू इज धंगेकर विचारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यांसाठी रवींद्र धंगेकर यांची अनोखी चाल
चंद्रकांत पाटील, रवींद्र धंगेकर
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरातील विविध विषयासंदर्भात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीस कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शहरातील इतर आमदारांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि बैठकीला निमंत्रित आमदारांपेक्षा भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी गणेश बिडकर हेच जास्त बोलत होते. यामुळे आमदार रवींद्र धंगेकर तडकाफडकी बैठकीतून निघून गेले. त्यानंतर धंगेकर नाराज असल्याचं आपल्याला माहितच नसल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिली. तर, रात गई बात गई आता ते आमदार झालेत लोकप्रतिनिधी झालेत.

आता घरी जेवायला जाईल


निवडणूक प्रचार चंद्रकांत पाटील यांनी ‘हू इज धंगेकर’ असा प्रश्न प्रचार सभेतून विचारला होता. अर्थात धंगेकर निवडून आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्त्व्याचा सोशल मीडियातून चांगलाच समाचार घेतला गेला. आज बैठकीनंतर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, धंगेकर यांनी आता घरी जेवायला बोलावले तरी जाईल. यावर आता रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांना वेळ असेल तर नक्कीच जेवायला बोलावेल असं म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

गणेश बिडकर का आलेत


चंद्रकांत पाटील पहिल्यापासून म्हणतात ‘हू इज धंगेकर’ त्यांना माहीतच नाही धंगेकर कोण आहे. पुण्याच्या प्रश्नावर बैठक सुरू होती, तेव्हा अचानक गणेश बिडकर तिथे आले ते कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत, जर आमदारांना आमंत्रण होते तर त्यांनीमध्ये येऊन चर्चा केली ते योग्य वाटलं नाही. त्यामुळे मी तिथून निघून आलो. चंद्रकांत पाटील मला ओळखच देत नव्हते, माझ्याकडे बघतच नव्हते, त्यामुळे मला उठून यावं लागलं, असं धंगेकर म्हणाले आहेत. दरम्यान, चंद्रकांत दादांना वेळ असेल तर मी नक्कीच त्यांना घरी जेवायला बोलावणार कारण आपले दारं सगळ्यांसाठी उघडे असतात, असं देखील धंगेकर म्हणाले आहेत.

टिळक कुटुंबावर पुणेकरांचे प्रेम


मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता. आजारपणामुळे मुक्ताताईंचं दिसणं, असणं, अस्तित्व हे संपलं होतं. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला, त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. त्यामुळे टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावरून देखील रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

मुक्ताताई टिळक हे लोकमान्य टिळकांचे कुटुंब आहे. त्यांचा वारसा पुणेकरांना माहीत आहे. पुणेकरांनी या कुटुंबाला सुरुवातीपासून डोक्यावर घेतलेल आहे. लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन खर्ची घातले आणि अशा कुटुंबाबद्दल माझ्या मनात निश्चित आपुलकी आहे. मात्र त्यांच्या पक्षाला जो निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला असे धंगेकर म्हणाले आहेत.