Pune Crime: वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ वाद, कोयत्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, एक हात आणि तीन बोटं तुटली, राजगुरूनगर हादरले

Pune Rajgurunagar Crime: गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. शरीरावर ७०० टाके, एक हात आणि ३ बोटे तुटली. या घटनेने राजगुरुनगर हादरले.

Pune Crime: वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ वाद, कोयत्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, एक हात आणि तीन बोटं तुटली, राजगुरूनगर हादरले
राजगुरूनगर हादरले
| Updated on: Nov 11, 2026 | 11:58 AM

Pune Rajgurunagar Crime: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात शिवम करमारे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या शरीरावर तब्बल ७०० टाके पडले आहेत. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पुण्यासह ग्रामीण भागातही कोयता गँगची दहशत

Loading...

पुण्यासह ग्रामीण भागात कोयता गँगची दहशत थांबण्याचं नाव घेत नाहीये. राजगुरुनगर शहरात भरदिवसा घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत. शिवम करमारे या तरुणाचा केवळ गाडीला कट मारण्यावरून काही मुलांशी वाद झाला होता. या किरकोळ वादाचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी धारदार कोयत्याने शिवमवर हल्ला चढवला. यामुळे सर्वच हादरले.

तीन बोटे तुटली, हात निकामी

डोक्यात, पाठीवर आणि हातावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात शिवमची तीन बोटे जागीच तुटली असून त्याचा एक हात कायमचा निकामी झाल्याची माहिती समोर येत आहे. गंभीर रक्तबंबाळ अवस्थेत शिवमला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्या शरीरावर तब्बल ७०० टाके घालावे लागले. क्षुल्लक कारणावरून थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अल्पवयीन मुलांच्या वाढत्या हिंसक प्रवृत्तीमुळे पालकांसह पोलिसांची डोकेदुखी वाढली असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

या भाई, दादांचा बंदोबस्त कधी करणार?

पुणे शहरासह ग्रामीण भागातही स्वयंघोषित दादा, भाईंची दहशत दिसून येत आहे. राजरोसपणे हे गुंड सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले करत असताना पोलीस काय करत आहेत, असा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. यांची भाईगिरीची नशा उतरवण्याची मागणी आता नागरिक करत आहेत. या भाई-दादांना कोण वाचवतं आहे आणि पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का, असा सवालही यानिमित्ताने समोर येत आहे. थेट हात निकामी करण्यापर्यंत आणि बोट तोडण्यापर्यंत यांची हिंमत कशी होते असा सवाल पोलिसांना करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us