पुणे ISIS मॉड्यूल | रेल्वेचा पैसा अतिरेक्यांना, या क्लार्कचा शोध घेतेय NIA

Nia pune isis module : पुणे शहरात इसिस मॉड्यूलचा प्रकार उघड झाला होता. यानंतर तपास संस्थांचे लक्ष पुणे शहरावर आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता रेल्वेतील एका क्लार्कने रेल्वेचा पैसा अतिरेक्यांना दिला. त्या क्लार्कचा प्रकार उघड झाला आहे. त्याचा शोध एनआयए...

पुणे ISIS मॉड्यूल | रेल्वेचा पैसा अतिरेक्यांना, या क्लार्कचा शोध घेतेय NIA
| Updated on: Dec 25, 2023 | 2:53 PM

पुणे, दि.25 डिसेंबर | राजस्थानमधून फरार झाल्यानंतर पुणे शहरात इसिस मॉड्यूल सक्रीय करण्यासाठी काही दहशतवादी काम करत होते. पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. एका मोटारसायकल चोरी प्रकरणात इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांना पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर इसिस मॉड्यूलचा धक्कादायक माहिती मिळल्यावर तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) देण्यात आला. एनआयएन या प्रकरणात पंधरा पेक्षा जास्त जणांना अटक केली. त्यात ठाणे, मुंबई आणि पुणे शहरातील अतिरेकी आहे. या अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून धक्का देणारे अपडेट मिळाले आहे. उत्तर रेल्वेतील एका क्लार्कने रेल्वेचा पैसा अतिरेक्यांना दिल्याचे चौकशीतून समोर आले आहे. आता एनआयए त्या रेल्वे क्लार्कचा शोध घेत आहेत.

असे उघड झाले प्रकरण

उत्तर रेल्वेच्या एका क्लार्कचा शोध एनआयए घेत आहे. या क्लार्कने रेल्वेचा पैसा इसिसच्या संपर्कात आलेल्या अतिरेक्यांना दिला आहे. या क्लार्कने रेल्वेकडे अनेक बनावट वैद्यकीय बिले सादर केली. त्यामाध्यमातून मिळालेला पैसा अतिरेक्यांना दिला. या प्रकरणात रेल्वेला बनावट वैद्यकीय बिले देऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दिल्ली पोलिसांच्या पार्लियामेंट पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एनआयएने पाच लाखांचा पुरस्कार जाहीर केलेल्या शाहनवाजसह तीन अतिरेक्यांना अटक केली होती. त्या तिघं अतिरेक्यांची अटक दिल्लीतून झाली होती. या अतिरेक्यांच्या चौकशीतून अनेक राज बाहेर आले आहेत. त्यात क्लार्कने पैसे पुरवल्याची माहिती मिळाली. या क्लार्कला अटक केल्यानंतर आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोंबर महिन्यात ठोकल्या बेड्या

दिल्ली पोलिसींना दोन ऑक्टोंबर रोजी मोहम्मद शाहनवाज याला अटक केली होती. त्यावेळी इतर दोघांना अटक केली होती. या अतिरेक्यांवर एनआयएने पाच लाखांचा पुरस्कार जाहीर केला होता. या तिघांना विदेशातील हँडलर्सकडून निर्देश मिळत होते. उत्तर भारतात मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा तयारीत हे अतिरेकी होती.