इंद्रायणी पुलाचं धक्कादायक वास्तव समोर, खुद्द तहसीलदारांनी सांगितलं काय घडलं?

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इ्ंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तहसीलदार विक्रम पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

इंद्रायणी पुलाचं धक्कादायक वास्तव समोर, खुद्द तहसीलदारांनी सांगितलं काय घडलं?
Indrayani River Bridge Collapase news
| Updated on: Jun 15, 2025 | 5:06 PM

पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इ्ंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 6 जणाचा मृत्यू झाला असून 20-25 जण वाहून गेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याबाबत तहसीलदार विक्रम पाटील यांनी या घटनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले तहसीलदार? 

टीव्ही 9 मराठीशी बोलताना तहसीलदार विक्रम पाटील यांनी सांगितले की, ‘पोलिस प्रशासन सध्या मतदकार्यात व्यस्त आहे. तसेच NDRF टीमला बोलवण्यात आलं आहे. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका हजर आहेत. सध्या मदत कार्य सुरु आहे.’

या पर्यटनस्थळावर कोणतही नियोजन नाही त्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. याबाबत बोलताना तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले की, याबाबत नक्कीच चौकशी करण्यात येईल. सध्या आम्ही मदतकार्य करत आहोत.”

आमदार सुनिल शेळके काय म्हणाले?

या घटनेनंतर आमदार सुनिल शेळके यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले की, “या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत. जमेल त्या पद्धतीने मदतकार्य केले जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचल्या आहेत. नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.’

पूल कोसळण्यामागील कारण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार या भागात पर्यटकांनी गर्दी केली होती. नदी ओलांडताना अनेक पर्यटक जीर्ण झालेल्या या पुलावर वाहने घेऊन चढले होते. त्यामुळे पुलावरील वजन वाढले आणि हा पूल कोसळला. यात अनेक लोक वाहून गेले आहेत आणि 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र 20-25 लोक वाहून गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.