कोयता जवळ बाळगणे परवडले पण ‘गर्ल फ्रेंड’ नाही, पुण्याच्या कोयता गँगच्या म्होरक्यासोबत काय झाले पाहा

| Updated on: Mar 30, 2023 | 7:53 AM

पुणे पोलिसांना कोयता गँगसंदर्भात आतापर्यंत मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. पोलिसांनी कोयता गँगचा लीडर व त्याचा काही साथीदारांना अटक केली आहे.

कोयता जवळ बाळगणे परवडले पण गर्ल फ्रेंड नाही, पुण्याच्या कोयता गँगच्या म्होरक्यासोबत काय झाले पाहा
मृत घोषित केलेली मुलगी तीन वर्षांनी जिवंत परतली
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पुणे : पुण्यात कोयता गँगने मोठा धुडगुस घातला होता. सामान्य नागरिक कोयता गँगच्या कारवायांमुळे त्रस्त झाले होते. यामुळे कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांनी (Crime News) धडक कारवाया सुरु केल्या आहेत. या गँगचा म्होरक्याला अटक केली आहे. या म्होरक्यासह त्याच्या गँगमधील इतर साथीदारांवर मकोका लावण्यात आला आहे. पुणे पोलिसांना कोयता गँगसंदर्भात आतापर्यंत मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. पोलिसांनी मीनाताई ठाकरे कॉलनीतील इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये आंतक माजवणाऱ्या कोयता गँगचा लीडर सचिन माने (Sachin Mane) याच्यासह काही साथीदारांना अटक केली आहे.

प्रियेसीची भेट पडली महागात

सचिन माने याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर कोयता, तलवारसारखी हत्यारे जप्त केली आहे. तसेच त्याच्या पूर्ण गँगवर मकोकानुसार कारवाई केली आहे. सचिन मानेसोबत रोहित जाधव, अजय दिखले, यश माने, अमर जाधव, विजय दिखले, मोन्या उर्फ सूरज काकडे,निखिल राकेश पेटकर यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही अल्पवयीन आरोपीसुद्ध आहेत.

हे सुद्धा वाचा

मीनाताई ठाकरे इंडस्ट्रियल कॉलनीत सचिन माने व त्याच्या साथीदारांनी दुसरी गँग प्रकाश पवार व त्यांच्या साथीदारांवर हल्ला केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली होती. पुण्यात दहशत माजवणारी ही गँगनंतर फरार झाली होती. सचिन माने घोरपडे पेठेत त्याच्या प्रियेसीला भेटण्यासाठी येत असल्याची सूचना पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

पोलिसांवर केला वार

पोलीस येताच सचिन माने याने पोलिसांवर कोयत्याने वार केले. त्यात काही जण जखमी झाले. पोलीस कर्मचारी शिवा गायकवाड जखमी झाले. वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक इंदलकर, पुलिस निरीक्षक (अपराध) सोमनाथ गायकवाड, सहायक निरीक्षक प्रशांत सांडे, उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या टीमने त्याला अटक केली.

एसएम कंपनी नावाने गँग

सचिन माने याने इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये ‘एसएम कंपनी’ नामाने क्रिमिनल गँग सुरू केली होती. माने विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, चोरी असे अनेक गुन्हा विविध पोलिस ठाण्यात दाखल आहे.

शाळांमध्ये समुपदेशन

भाई-दादांचा रुबाबामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहे. यामुळे पोलिसांनी शाळांमध्ये समुपदेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2022 मध्ये 303 गुन्ह्यांत 476 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यापैकी 42 मुलांचा मागे कोणत्या अन् कोणत्या गुन्हेगारांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, गंभीर दुखापत असे गुन्हे या मुलांवर दाखल होते.