AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : जर शत्रू घरातीलच असेल तर त्याचा पराभव कसा करायचा? चाणक्य म्हणतात…

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य म्हणतात जसे तुमचे शत्रू हे बाहेर असू शकतात, तसेच तुमचे शत्रू हे तुमच्या घरात देखील असू शकतात. घरातील शत्रू हे बाहेरच्या शत्रूपेक्षा अधिक घातक असतात. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

Chanakya Niti : जर शत्रू घरातीलच असेल तर त्याचा पराभव कसा करायचा? चाणक्य म्हणतात...
CHANAKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 09, 2026 | 9:13 PM
Share

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, माणसानं शत्रूपासून कसं सावध राहावं? शत्रूचा पराभव कसा करावा? शत्रूवर वार करण्याची योग्य वेळ कोणती? शत्रूची चाल कशी ओळखावी? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात दोन प्रकारचे शत्रू असतात, एक म्हणजे बाहेरचे शत्रू, हे शत्रू उघड असल्यामुळे आणि तुमच्या ओळखीचे असल्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून कायम सावध राहू शकता, त्यांच्याविरोधात रणनीती बनवणं सहज सोपं असतं, मात्र दुसऱ्या प्रकारचे जे शत्रू असतात, ते अतिशय खतरनाक असतात, कारण हे शत्रू दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच असतात, आपल्याच घरातील असतात. असे शत्रू आपल्याला लवकर ओळखतात येत नाहीत, त्यामुळे आयुष्यात आपलं मोठं नुकसान होऊ शकतं, तर अशा शत्रूंपासून सावध कसं राहायचं? घरातील शत्रू कसे ओळखायचे याबाबत चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

चाणक्य म्हणतात शत्रू हे दोन प्रकारचे असतात. बाहेरचे शत्रू आपल्याला माहिती असतात, मात्र घरातील शत्रू हे आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे खरा धोका त्यांच्यापासूनच असतो. त्यामुळे माणसाने नेहमी सावध असलं पाहिजे. जर तुमच्या घरातील एखादा व्यक्ती तुमचा शत्रू असेल किंवा तो तुमच्याबद्दल वाईट चिंतित असेल तर तुम्हाला काही विशिष्ट संकेत मिळतात, ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला त्याबद्दल खात्री होईल, तेव्हा अशा व्यक्तीपासून सावध राहण्यातच तुमचं हित आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

योजना – चाणक्य म्हणतात अशा लोकांपासून आपल्या योजना या नेहमी गुप्त ठेवाव्यात, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की घरातच तुमचा कोणीतरी शत्रू आहे, तेव्हा तुम्ही जर तुमच्या व्यवसायासंदर्भात किंवा भावी आयुष्यसंदर्भात एखादी योजना तयार केली असेल तर जोपर्यंत त्यामध्ये यश मिळत नाही, तोपर्यंत ती योजना गुप्त ठेवा, घरी देखील त्याबद्दल कोणतीही चर्चा करू नका.

पैसे – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्या घरातच शत्रू असतो, तेव्हा तुम्ही किती कमवता? किंवा तुमच्याकडे किती मालमत्ता आहे? किती धन आहे, याची कधीच घरात देखील चर्चा करू नका, कारण अशा चर्चेमुळे तुमचा शत्रू तुमच्याविरोधात कट कारस्थान रचू शकतो.

विश्वासू माणूस – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्या घरातच तुमचा शत्रू तयार होतो, अशावेळी तुम्हाला अशा एका तरी माणसाची आवश्यकता असते, ज्याच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकाल, आणि तुमच्या गैरहजेरीमध्ये असा माणूस तुमची सर्व कामे प्रामाणिकपणे करेल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घड
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल