AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष

महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष

| Updated on: Jul 03, 2026 | 12:14 PM
Share

महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code - UCC) लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, समान नागरी कायद्याबाबत अभ्यास आणि शिफारसी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code – UCC) लागू करण्याच्या दिशेने राज्य सरकारने हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, समान नागरी कायद्याबाबत अभ्यास आणि शिफारसी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत सकारात्मक असून, या विषयावर सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर समिती स्थापन करून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, सरकार नेमका कोणता निर्णय घेते आणि समितीची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 03, 2026 12:14 PM

Follow Us