AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब

Mumai Rain Update | पावसामुळे विधानसभेचे कामकाज ठप्प! मंत्रीच पोहोचले नाहीत, सभा तहकूब

| Updated on: Jul 03, 2026 | 11:10 AM
Share

मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका आता राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजालाही बसल्याचे चित्र समोर आले आहे. पावसामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक मंत्री वेळेत विधानसभेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी प्रभावित झाले.

मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका आता राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजालाही बसल्याचे चित्र समोर आले आहे. पावसामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक मंत्री वेळेत विधानसभेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी प्रभावित झाले.

सकाळी 9.30 वाजता विशेष सत्राला सुरुवात होणार होती. मात्र, लक्षवेधी सूचनेवरील उत्तर देण्यासाठी संबंधित मंत्री सभागृहात अनुपस्थित असल्याने विधानसभा अध्यक्षांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्याची घोषणा केली.

मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम ते मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून, त्याचाच परिणाम विधिमंडळाच्या कामकाजावर झाल्याची माहिती समोर आली आहे. वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे संबंधित मंत्री वेळेत विधानभवनात पोहोचू शकले नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्त्यांवरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्याचा परिणाम केवळ नागरिकांवरच नव्हे, तर राज्याच्या प्रशासकीय आणि विधिमंडळाच्या कामकाजावरही झाल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

Published on: Jul 03, 2026 11:10 AM

Follow Us
खासदार फुटीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हे लोक सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर….

खासदार फुटीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हे लोक सीरियल रेपिस्ट आणि सीरियल किलर…

देशात हुकूमशाही सुरू झालीय, भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात.

देशात हुकूमशाही सुरू झालीय, भीती वाटल्याने वांगचुक यांना घेऊन गेलात; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

अरे सोड रे शिंदे शिंदे काय चाललंय? शिंदे म्हणजे काय राममनोहर लोहिया आहेत का? की नेहरू आहेत? संजय राऊत संतापले.

अरे सोड रे शिंदे शिंदे काय चाललंय? शिंदे म्हणजे काय राममनोहर लोहिया आहेत का? की नेहरू आहेत? संजय राऊत संतापले

निवडणुकीचा बिगुल वाजणार, ऑक्टोबरमध्ये मतदान; छत्रपती संभाजीनगरात गावगाड्यातील वर्चस्वासाठी घडामोडींना वेग.

निवडणुकीचा बिगुल वाजणार, ऑक्टोबरमध्ये मतदान; छत्रपती संभाजीनगरात गावगाड्यातील वर्चस्वासाठी घडामोडींना वेग

‘खाशाबा’ची चर्चा असताना नागराज मंजुळेंचा हा सिनेमा टॉप ट्रेंडिंगमध्ये; व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध साकारली भूमिका.

‘खाशाबा’ची चर्चा असताना नागराज मंजुळेंचा हा सिनेमा टॉप ट्रेंडिंगमध्ये; व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध साकारली भूमिका

थेट माजी महापौरांनाच 200 तोळे सोन्याला चुना, घरातील महिलांच्या एका चुकीमूळे धक्कादायक प्रकार.

थेट माजी महापौरांनाच 200 तोळे सोन्याला चुना, घरातील महिलांच्या एका चुकीमूळे धक्कादायक प्रकार