AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाटात अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, 40 जणांचा मृत्यू

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत.  बलूचिस्तानच्या सीमेवर ही दुर्घटना घडली. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस वळणाच्या रस्त्यावर उलटून दरीत कोसळली. ही बस क्वेटाहून इस्लामाबादला जाताना हा अपघात घडला. या घटनेने संपूर्ण पाकिस्तानमध्ये शोककळा पसरली आहे. बलूचिस्तान […]

घाटात अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, 40 जणांचा मृत्यू
| Updated on: Jul 03, 2026 | 1:54 PM
Share

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत.  बलूचिस्तानच्या सीमेवर ही दुर्घटना घडली. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस वळणाच्या रस्त्यावर उलटून दरीत कोसळली. ही बस क्वेटाहून इस्लामाबादला जाताना हा अपघात घडला. या घटनेने संपूर्ण पाकिस्तानमध्ये शोककळा पसरली आहे.

बलूचिस्तान राज्य सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा देत म्हटलं की, बलूचिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सीमेवर बस दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर 8 जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच 6 रुग्णवाहिका, 12 वैद्यकीय कर्मचारी, 10 वाहने घटनास्थळी पोहोचले.

प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, बस प्रवाशांनी भरलेली होती. बसच्या छतावरही प्रवासी बसले होते. खरंतर बसमध्ये आधी फक्त 36 प्रवासी बसले होते. परंतु खराब रस्त्यावर एका बंद पडलेल्या बसमधील प्रवासी या बसमध्ये येऊन बसले. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये बसल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच शेरानी जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बचाव पथक घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलं.

पाकिस्तानी नागरिकांकडून हळहळ

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आणि बलूचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती संवदेना व्यक्त केली. तसेच त्यांनी प्रशासनाला जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. शेरानीचे उपायुक्त हजरत वली काकर यांनी म्हटलं की, आता जखमींची प्रकृती स्थिर आहे. प्रवाशांचे मृतदेह हे रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आले आहेत. आता मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच मृतांची नावे देखील अद्याप समोर आलेली नाही. या भीषण अपघाताने पाकिस्तान, बलूचिस्तानमधील नागरिक शोकसागरात बुडाले आहेत. या अपघातानंतर अनेक जण हळहळ व्यक्त करत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ