AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...

दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला…

| Updated on: Aug 21, 2026 | 11:53 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्राच्या सचिवांसोबत तिसरी उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्राच्या सचिवांसोबत तिसरी उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली. देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला अधिक कार्यक्षम आणि दूरदृष्टीचे बनवण्यासाठी पंतप्रधानांनी या बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी सचिवांना देशाच्या भवितव्याची दिशा ठरवताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन केलं. केवळ सद्यस्थितीचा विचार न करता, पुढील अनेक वर्षांचा वेध घेऊन धोरणे आखण्यावर त्यांनी भर दिला.

याशिवाय, डेटा ही राष्ट्रीय संपत्ती असल्याचे सांगत, त्याचा प्रभावी वापर करण्याचं महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. निर्णयप्रक्रियेत आणि योजनांच्या अंमलबजावणीत डेटाचा योग्य वापर कसा करता येईल, यावर त्यांनी चर्चा केली. विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय वाढवण्यावरही या बैठकीत विशेष भर देण्यात आला. एकमेकांसोबत अधिक चांगल्या प्रकारे काम केल्याने योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे मोदींनी स्पष्ट केले. ही बैठक देशाच्या प्रशासकीय सुधारणा आणि भविष्यातील विकासासाठी दिशादर्शक मानली जात आहे.

Published on: Aug 21, 2026 11:53 AM

Follow Us