श्वेता तिवारीचा थेट राज ठाकरेंना सवाल; मराठी माणूस म्हणजे फक्त..
अभिनेत्री श्वेता तिवारी ट्रोलिंगला कंटाळून संतापली आहे. मराठी असल्याचा दावा करणारे लोक तिला अश्लील मेसेज पाठवत असल्यामुळे तिने राज ठाकरेंना थेट सवाल केला आहे. "फक्त मराठी बोलणं, स्वतःला मराठी म्हणवणं इतकंच पुरेसं नाही. असे समर्थक तुम्हाला मान्य आहेत का?" असा जाब तिने विचारला आहे.
अभिनेत्री श्वेता तिवारीने समाजमाध्यमांवरील ट्रोलिंग आणि अश्लील संदेशांना कंटाळून तीव्र संताप व्यक्त केला आहे. मराठी माणूस असल्याचा दावा करणाऱ्यांकडून महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ केली जात असल्याच्या प्रकारांमुळे श्वेता तिवारीने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टॅग करत जाब विचारला आहे.
तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे की, “मराठी माणूस म्हणवणारे लोक महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन त्यांना अश्लील भाषेत शिव्या देतात. तेव्हा विचारावंसं वाटतं की मराठी माणूस असण्याचा हाच अर्थ आता उरलाय का?” तिने राज ठाकरेंना थेट प्रश्न विचारला आहे की, “राजजी, असे लोक तुमचे समर्थक असतील तर जाणून घ्यायला आवडेल की, त्यांचं वर्तन तुम्हाला मान्य आहे का?” श्वेता तिवारीने स्पष्ट केले आहे की, “फक्त मराठी बोलणं, स्वतःला मराठी माणूस म्हणवणं नक्कीच इतकं पुरेसं नाही.” तिच्या या भूमिकेने सध्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिला असे आक्षेपार्ह मेसेजेस आल्यानंतर तिने हा विषय उचलून धरला आहे.
Published on: Aug 21, 2026 01:16 PM
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...

