AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?

संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; ‘शिवतीर्था’वरील बैठकीत… नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 21, 2026 | 12:41 PM
Share

संजय राऊत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले आहेत. यापूर्वीही राऊत यांनी राज ठाकरे यांची वेळोवेळी भेट घेतली आहे, ज्यात विविध राजकीय आणि कार्यक्रम आयोजनाशी संबंधित चर्चा झाल्या आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले आहेत. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राऊत यांनी शिवतीर्थावर दाखल होऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे, मात्र या भेटीमागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

यापूर्वीही संजय राऊत अनेक वेळा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे. विविध राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी किंवा काही कार्यक्रमांच्या आयोजनाच्या निमित्ताने या भेटी होत असल्याचे दिसून आले आहे. आजच्या भेटीमागचे कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मध्यंतरीच्या काळात ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे काढलेल्या तिरंगा मार्चला तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. अशाच प्रकारच्या एखाद्या नव्या घडामोडीची ही सुरुवात आहे का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. सध्या या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता वाढवली आहे.

Published on: Aug 21, 2026 12:41 PM

Follow Us