AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde Shivsena : ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर शिंदे शिवसेनेची पहिली जळजळीत प्रतिक्रिया, ‘तुमच्या मिरवणुकीत मुसा..’

Eknath Shinde Shivsena : उद्धव ठाकरे यांनी आज राम रक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यावर एकनाथ शिंदे शिवसेनेकडून जळजळीत प्रतिक्रिया आली आहे. राम मंदिर दान पेटीतील चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

Eknath Shinde Shivsena : ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर शिंदे शिवसेनेची पहिली जळजळीत प्रतिक्रिया, 'तुमच्या मिरवणुकीत मुसा..'
Uddhav Thackeray-Eknath Shinde
| Updated on: Jul 03, 2026 | 2:12 PM
Share

मागच्या काही काही दिवसांपासून राजकीय धक्क्यांवर धक्के पचवणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज राम रक्षा आंदोलनाची घोषणा केली. येत्या 5 जुलैला रविवार संध्याकाळपासून राज्यभरात ठाकरे गट शिवसेनेकडून हे आंदोलन सुरु होणार आहे. राम मंदिर दान पेटीतील चोरीचा मुद्दा उचलून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची मशाल हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी दिवंगत भाजप नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका वाक्याची आठवण करुन दिली. ‘अब हिंदू मार नही खायेगा’ असं वाजपेयी म्हणाले होते. आता मी म्हणेन ‘हिंदू माफ नही करेगा’. उद्धव ठाकरे यांच्या राम रक्षा आंदोलनावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.

राम मंदिर दान पेटीतील चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्याला शिवसेना नेते, प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं. “राजकारणासाठी पैसा वापरला जातो असं बोलणं बालिशपणा आहे. पूर्वी राणा दाम्पत्यांने हनुमान चालीसा वाचली म्हणून अटक केली, आता हनुमान चालीसा वाचणार, या निमित्ताने तुम्हाला हनुमान चालीसा वाचायला मिळतेय. तुमच्या राजकारणासाठी आता हिंदूची गरज आहे” अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

त्यांना तुमचे हिंदुत्व मान्य आहे का विचारा

“तुमच्या मिरवणुकीत नाचणारा मुसा, हे सगळं बेगडी प्रेम आहे. हिंदुंचा नारा देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घ्या. ज्या पक्षाला सोबत घेतले, त्यांना तुमचे हिंदुत्व मान्य आहे का विचारा. सगळ्याच चुकांचा पश्चाताप करण्यासाठी दादरला जाऊन हनुमान चालिसा वाचावी आणि हनुमानाकडे चुकले म्हणून माफी मागा” अशी उपरोधिक टीका संजय शिरसाट यांनी केली.

ते श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरे यांचं

“ज्याने लूट केली असेल, त्याला आम्ही माफ करणार नाही. ही सगळ्यांची भूमिका आहे. जिथे श्रध्दा आहे तिथे लूट होऊ नये. राममंदिराची रथयात्रा अडवाणी यांनी काढली तेंव्हा मोठा प्रतिसाद मिळाला. घुमट पाडल्यानंतर एकमेव शेर, वाघ बाळासाहेबांनी शिवसैनिक असतील तर मला गर्व आहे असं वक्तव्य केलं होतं . त्याचं क्रेडिट घेऊ नका, ते श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे आहे” असं शिरसाट म्हणाले.

हिंदुंशी त्यांचा आता काडीमात्र संबंध नाही

“संघर्षाच्या काळात आम्ही अयोध्येला गेलो होतो. म्हणजे अमित शहा यांना राम पावत नाही तो पर्यंत तुम्ही जाणार नाही असे म्हणायचे का?हनुमान चालीसा वाचून तुम्ही हिंदूंची माफी मागणार आहात का? रामाच्या नावावर राजकारण करण्याची नवी दिशा देण्याचा प्रयत्न करू नये. हिंदुंशी त्यांचा आता काडीमात्र संबंध नाही. अगोदर पक्षाला जागे करा, स्वतः जागे व्हा, आजूबाजूला असलेल्या चांडाळ चौकडीला जागे करा मग देशाचा विचार करा” असा उपरोधिक सल्ला संजय शिरसाट यांनी दिला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ