AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर, पत्रकार परिषदेत मोठी घोषणा, रविवारी संध्याकाळी 4 वाजता..

Uddhav Thackeray : "राम मंदिरातील चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे. अब हिंदू मार नही खायेगा असं वाजपेयी म्हणाले होते. आता मी म्हणीन हिंदू माफ नही करेगा" यासह उद्धव ठाकरे यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर, पत्रकार परिषदेत मोठी घोषणा, रविवारी संध्याकाळी 4 वाजता..
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 03, 2026 | 1:43 PM
Share

मागच्या काही दिवसांपासून राजकारणात मोठे धक्के सहन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर परतण्याचे संकेत दिले आहेत. राम मंदिराच्या दान पेटीत झालेल्या चोरीच्या मुद्यावर त्यांनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. “राम मंदिराचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे. अब हिंदू मार नही खायेगा असं वाजपेयी म्हणाले होते. आता मी म्हणीन हिंदू माफ नही करेगा. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करणार आहोत. दादरमध्ये मारुतीच मंदिर आहे तिथे चारच्या सुमारास जमणार आहोत. राम रक्षा आंदोलन सुरु करणार आहोत” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

“भाजपच्या सत्तेचं मूळ राम मंदिर आहे. राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं होतं. त्यात अनेक शिवसैनिक सहभागी होते. तो काळ आजही आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. ती दृश्य जनतेच्या मनात रुजलेली आहेत. राम मंदिराच्या मुद्याला भाजपने हात घातला. आज अमर्यादा सत्ता उपभोगत आहेत. आज आमदार, खासदार फोडले जात आहेत. याला ऑपरेशन नाव दिलं जातं. मग आता भाजपं ऑपरेशन राम मंदिर करतय का? राम मंदिरावर दरोडा टाकला गेला आहे” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपच्या सत्तेचं मूळ हे राम मंदिर

“आपल्या देशात राज्यात शहरात राजकारणात नागरिकांच्या जीवनात अनेक व्यथा समस्या भेडसावत आहेत.  तुमच्या मनात प्रश्न आहे. माझ्याही मनात प्रश्नांबद्दल प्रश्न आहेत. आज मी एकाच विषयावर बोलणार आहे. संपूर्ण देशात गोंधळ उडाला आहे. कोणी कुणाचं उत्तरादायित्व घेत नाही. मुळावर आघात करण्याची वेळ आली आहे. भाजपच्या अंमला खाली देश आहे. भाजपच्या सत्तेचं मूळ हे राम मंदिर आहे. त्यात आम्ही आहोत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यात हिंदुंनी बरंच काही सोसलं होतं

“राम मंदिरासाठी जे आंदोलन झालं. त्यात शिवसैनिक देशातील हिंदू सहभागी होता. तुमच्या माध्यमातून त्या काळातील दृश्य जनतेच्या मनात खोलवर रुजली आहे. गोध्रा, अहमदाबादमधील दंगल, मुंबईतील बॉम्बस्फोट. त्यात हिंदुंनी बरंच काही सोसलं होतं. त्याचं भांडवलं भाजपने केलं. राम मंदिर आंदोलन सुरू करण्यापूर्वी त्यांचे दोन खासदार होते. गांधी वादी, समाजवाद त्यांचा होता. ते सोडून ते राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला. आज देशात अमर्याद सत्ता भोगत आहे” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

या चोरीच्या पैशांचा इतर पक्ष फोडण्यासाठी वापर

“आज राम मंदिर वेगळ्या गोष्टीसाठी चर्चिलं जात आहे. दरोडेखोरी सुरू आहे. आमदार खासदार फोडले जात आहेत. त्याला ऑपरेशन नाव दिलं जात आहे. आता ऑपरेशन राम मंदिर भाजप करत आहे का. या बातम्या दाखवल्या जात असतील नसतील. पण चोरी होत आहे. राम मंदिरावर दरोडा टाकला जात आहे. काहींच्या मते हा चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापर केला जात आहे” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

Follow Us
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार