नातेवाईकास आत्महत्या करत असल्याचा कॉल केला, अन् पोलिसाने काय केले

| Updated on: Mar 17, 2023 | 3:15 PM

पुणे जिल्ह्यातून पोलिसाच्या नैराश्याची बातमी आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या कर्मचाऱ्याने नातेवाईकांना कॉल केला. त्यानंतर आत्महत्या केली.

नातेवाईकास आत्महत्या करत असल्याचा कॉल केला, अन् पोलिसाने काय केले
buldhana police
Image Credit source: tv9marathi
Follow us on

पुणे : पोलिसांवर होत असलेले हल्ले आणि त्यांचा वाढत चाललेल्या मानसिक ताण यावर नुकतेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. पोलिसांना नैराश्य येत असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता पुणे जिल्ह्यातून पोलिसाच्या नैराश्याची बातमी आली आहे. शिरूर नजीकच्या नवले मळा येथे पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या (Pune Rural Police) पोलिस कर्मचार्‍याने गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली आहे. यामुळे पोलिसांमधील तणावाच प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्यात जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे ( वय ३४) हे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. त्यांनी कारेगाव परिसरातील नवले मळा येथे एका विहिरीतील रहाटाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. त्यातूनच आत्महत्येसारखे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

नातेवाईकांना केला फोन


जितेंद्र मांडगे यांनी तणावातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी नातेवाईकांना फोन केला. आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईक पोहचण्यापूर्वीच नवले मळा येथील विहिरीत रहाटाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ते सरळ स्वभावाचे होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून तणावात होते.

यापूर्वी केला प्रयत्न

जितेंद्र मांडगे यांनी नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. जानेवारी 2022 मधील ही घटना होती. त्यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला होता. मांडगे यांनी आत्महत्या का केली याचे कारण समोर आले नाही. परंतु ते तणावात होते, असे सांगितले जात आहे. या प्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहेत.