खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, भिडे पुलावरील वाहतूक बंद

पुण्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातला पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, भिडे पुलावरील वाहतूक बंद
| Edited By: | Updated on: Sep 16, 2022 | 11:35 AM

पुणे : सध्या पावसाचा जोर वाढतो आहे. पुण्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस (Pune Rain Update) कोसळतोय. खडकवासला धरणातून (Khadakwasala Dam) मुठा नदीपात्रातला पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे भिडे पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भिडे पुलावरची वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. नदीपात्रातील दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर पाणी आल्याने नदीपात्रातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच नागरिकांनीही सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.