SPPU Exam | पुणे विद्यापीठाच्या फेब्रुवारीच्या मध्यात सुरु होण्याची शक्यता ; बॅकलॉगच्या परीक्षा कधी होणार घ्या जाणून

या वर्षीसुद्धा ऑनलाइन परीक्षा घेणाऱ्या एजन्सीबरोबर कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करण्यात आलेली नाही. विद्यापीठाच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असल्या तरी अद्याप परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

SPPU Exam | पुणे विद्यापीठाच्या फेब्रुवारीच्या मध्यात सुरु होण्याची शक्यता ; बॅकलॉगच्या परीक्षा कधी होणार घ्या जाणून
SPPU -Pune
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 3:22 PM

पुणे – येत्या 15  फेब्रुवारीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule with Pune University)संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होण्याची शक्यता आहे. बॅकलॉग’च्या(backlog) विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतली जाण्याच्या शक्यता आहे. याबाबत मात्र, परीक्षा विभागाच्या(Exam Department) कार्यपद्धतीवर चर्चा करण्यासाठी येत्या २९ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षा विभागाच्या कामकाजावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य

विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे जाहीर करण्यात आला होता. मात्र परीक्षा मंडळाच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच व्यवस्थापन परिषदेकडून एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशनच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या खर्चास मान्यताही घेण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा विभागाच्या कामकाजावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नाराज आहेत.त्यामुळे परीक्षा विभागाच्या एकूण कामकाजावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे.

निविदा प्रक्रियेस उशीर
गतवर्षी विद्यापीठाने परीक्षा ऑनलाइन पद्धती घेण्याची निविदा प्रक्रिया  वेळत न राबविल्याने सुमारे एक महिना परीक्षा उशिरा सुरू झाल्या होत्या. यावरूनच परीक्षा विभाग व विद्यापीठ प्रशासन यांच्या समन्वय नसल्याचे दिसून आले होते. या वर्षीसुद्धा ऑनलाइन परीक्षा घेणाऱ्या एजन्सीबरोबर कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करण्यात आलेली नाही. विद्यापीठाच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असल्या तरी अद्याप परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, सुरुवातीला पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू केली जाणार असून त्यानंतर अंतिम वर्षाच्या, द्वितीय वर्षाच्या व नंतर प्रथम वर्षाच्या परीक्षा टप्प्या-टप्पाने घेतल्या जाणार आहेत.

JustForLaugh : Viral Videoमध्ये काय म्हणतेय ही मुलगी, ज्यानंतर मित्र हसायला लागले!

भारताचे महान हॉकीपटू, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या संघाचे कॅप्टन चरणजीत सिंग यांचे निधन

सोयाबीनचे दर स्थिरावले आता तुरीवर लक्ष, टायमिंग साधले तरच शेतकऱ्यांचा फायदा..!