पुणे विद्यापीठाच्या ‘स्वच्छ वारी निर्मल वारी’ कार्यक्रमाच्या गैरव्यवहाराची होणार चौकशी, बडे मासे जाळ्यात अडकणार?

| Updated on: Aug 21, 2021 | 6:43 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) 2019 मध्ये झालेल्या 'स्वच्छ वारी, निर्मल वारी' (Swachh Wari Nirmal Wari 2019) या कार्यक्रमातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश विभागीय सहसंचालकांनी दिले आहेत.

पुणे विद्यापीठाच्या स्वच्छ वारी निर्मल वारी कार्यक्रमाच्या गैरव्यवहाराची होणार चौकशी, बडे मासे जाळ्यात अडकणार?
पुणे विद्यापीठ 'स्वच्छ वारी निर्मल वारी 2019' चौकशी
Follow us on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) 2019 मध्ये झालेल्या ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी’ (Swachh Wari Nirmal Wari 2019) या कार्यक्रमातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश विभागीय सहसंचालकांनी दिले आहेत. उच्च शिक्षण विभागाने या चौकशीसाठी एक सदस्यीस समिती नियुक्त केली आहे. 8 दिवसांमध्ये याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘स्टुडंट्स हेल्पींग हँड्स’ (Students Helping Hands) संघटनेने याबाबत सातत्यानं पाठपुरावा करत निवेदने दिली होती. (Savitribai Phule Pune University’s ‘Swachh Wari Nirmal Wari 2019’ program will be investigated by the Joint Director of Education)

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये कार्यक्रमाची नोंद

स्वच्छ वारी निर्मल वारी हा कार्यक्रम ३० जून २०१९ ला पार पडला होता. या कार्यक्रमाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली होती. या उपक्रमासाठी विद्यापीठाने 69 लाख रुपयांची तरतुद केली होती.

माहिती अधिकारात वेगवेगळी माहिती

या उपक्रमातील खर्चाच्या तपशिलाबाबत माहिती अधिकारीतून दोन वेळा माहिती मागवण्यात आली होती. मात्र, विद्यापीठाकडून पहिल्या माहिती अर्जास दिलेल्या खर्चाच्या रकमेत आणि दुसऱ्यांदा दिलेल्या माहितीत प्रचंड तफावत आढळली. पहिल्या अर्जाच्या उत्तरात खर्च तपशील 53 लाख आणि दुसऱ्या अर्जाच्या उत्तरात 35 लाख रुपये देण्यात आला. त्यामुळे विद्यापीठाने फसवी माहिती दिल्याचा आरोप स्टुडंट्स हेल्पींग हँड्सने केला आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी प्रायोजकाकडून 2 कोटी 71 लाख रु. मिळाले होते. यासंदर्भातील तपशील अद्यापही विद्यापीठाने दिलेला नाही.

माहिती देण्यास टाळाटाळ

स्वच्छ वारी, निर्मल वारी उपक्रमाच्या खर्च तपशिलासंदर्भात विद्यापीठाकडे वेळोवेळी माहिती विचारण्यात आली. कोणत्या व्यक्तीने किंवा कोणत्या संस्थेने मोठी रक्कम दिली आणि तिचे स्वरूप काय आहे असं विचारण्यात आलं. मात्र, विद्यापीठाने जाणीवपूर्वक माहिती देणं टाळून माहिती गुलदस्त्यात ठेवल्याचं विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे.

आठ दिवसांत माहिती सादर करण्याचे निर्देश

स्टुडंट्स हेल्पींग हँड्स संघटनेने दिलेल्या निवेदनाचा आधार घेत या चौकशीसाठी एक सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. निवेदनातल्या मुद्द्यांच्या आधारावर सविस्तर माहिती आठ दिवसांच्या आत उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत या अहवालाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे या चौकशीत काय सत्य समोर येतं याकडे विद्यार्थ्यांसोबतच विद्यापीठ वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या :

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवा, अन्यथा आंदोलन करु; नितेश कराळे गुरुजींचा सरकारला इशारा

CBSE Private Exam 2021: सीबीएसईकडून कंपार्टमेंट परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी, डाऊनलोड कसं करायचं?

ITI विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये संधी; नामांकित संस्थाशी सामंजस्य करार, नवाब मलिक यांची माहिती