राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात कोर्टात धाव, काय केला आहे आरोप?

| Updated on: Mar 24, 2023 | 11:53 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याला केलेल्या भाषणाविरोधात आधी पोलिसात तक्रार अर्ज दाखल झाला. आता न्यायालयात तक्रार केली गेली आहे. या सर्व प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अजून भूमिका जाहीर केली गेली नाही. परंतु यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात कोर्टात धाव, काय केला आहे आरोप?
Raj Thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रणजित जाधव, पिंपरी चिंचवड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्या सभा झाली होती. या सभेत त्यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्गा, सांगलीतील मशीद आणि मशिदीवरील भोग्यांसंदर्भात आवाज उठवला. माहीमचा दर्गा अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा, नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाई केली. सांगलीतही अशीच कारवाई झाली. परंतु दुसरीकडे राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात पुणे शहरात आधी तक्रार दाखल केली गेली. त्यानंतर आता कोर्टातही तक्रार अर्ज दाखल केला आहे.

काय आहे अर्ज

हे सुद्धा वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणाविरोधात पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिस स्थानकात तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर वाजिद सय्यद यांनी पिंपरीच्या मोरवाडी कोर्टातही राज ठाकरे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याचं त्याचबरोबर हिंदू मुस्लिम संघर्ष उभा राहण्याची शक्यता असल्याचा आरोप सय्यद यांनी या अर्जात केला आहे.

काय आहे तक्रारीत

राज ठाकरे यांनी २२ मार्च रोजी केलेले भाषण हिंदू-मुस्लीम समाजात भांडण लावणार आहे. त्यांच्या भाषणामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण राजकीय दबाबाखाली केले गेले आहे. रमजान महिन्यात केलेल्या या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज ठाकरे यांच्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना यापुढे भाषणासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी तक्रारदार वाजीद राजाक सय्यद यांनी वाकड पोलीस ठाण्यात केली आहे.

काय म्हणतात तक्रारदार


राज ठाकरे वारंवार हिंदू-मुस्लिमसंदर्भात वक्तव्य करत आहेत. ते फक्त मशिदीवरील भोग्यांसंदर्भात बोलतात. ते राजकारणाची पोळी भाजत आहेत, असे वाजीद यांनी म्हटले आहे.

सांगलीतील अनधिकृत बांधकाम हटवले


सांगलीतील कुपवाड येथे शाळेची जागा असताना त्या ठिकाणी अनधिकृत मशिदीचं बांधकाम करण्यात आलं होतं. अखेर राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर सांगलीतील हे बांधकाम हटवण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगलीतील जुना कुपवाड रोडवरील मंगलमूर्ती कॉलनी येथील बेकायदेशीररित्या मशीद उभारण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर सांगली महापालिकेकडून या ठिकाणी पाहणी करण्यात आली. महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी या जागेवर बांधण्यात येणारे बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले आणि त्यावर कारवाई करण्यात आली.