AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद मोहोळ याच्या हत्येवरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा, म्हणाले…

Rohit Pawar on Sharad Mohol Case : पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या मोहोळला गोळ्या घालून मारण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

शरद मोहोळ याच्या हत्येवरून रोहित पवारांचा फडणवीसांवर निशाणा, म्हणाले...
Sharad Mohol Rohit Pawar Devendra Fadnavis
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jan 07, 2024 | 5:10 PM
Share

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची दिवसाढवळ्या गोळ्या झालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ याच्याच साथीदाराने त्याला प्लॅन करून संपवलं. पुण्यातील कोथरूड परिसरातच त्याला मारण्याात आलं. गुंड शरद मोहोळ याच्या हत्येची राज्यभर चर्चा होत आहे. शरद मोहोळ याच्या हत्येवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

फडणवीस यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या शहरात ज्या दिवशी असता तिथे उघड घड दिवसाढवळ्या लोकांचे खून होत आहेत. आज सर्वात खराब पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्रात आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्यावर कामाचा लोड वाढला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद बाजूला ठेवावं आणि फक्त गृहमंत्रीपद पाहावं आणि तिथे तरी न्याय द्यावा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

जर होम मिनिस्टर म्हणून त्यांना न्याय देता येत नसेल तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा. ते काय करतात त्यावर त्यांनी जास्त बोलावं. दुसऱ्यांच्या गोष्टींवर जास्त बोलू नये असं मला वाटत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद मोहोळ याची हत्या झाल्यावर देवेंद्र फडणवीस पुणे शहरातच होते. शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया देताना, टोळी युद्ध काही नाही मोहोळ याला त्याच्याच साथीदाराने मारलं असल्याचं सांगितलं होतं.

शरद मोहोळचा कोणी काढला काटा

कुख्यात गुंड शरद मोहोळ याला त्याचाच साथादीर मुन्ना उर्फे साहिल पोळेकर याने आपल्या साथीदारांसह गोळ्या घातल्या. साहिल याने एकदम फुल प्रुफ प्लॅन करत मोहोळला संपवलं. दोन साथीदारांना आधीच बाहेर दबा धरून लावायला लावला होता. मोहोळच्या लग्नाचा वाढदिवसाचं घरी जेवला आणि बाहेर येताच  संधी साधून त्याला 5 जानेवारी 2024 ला गोळ्या मारत त्याची हत्या केली. शरद मोहोळ याची त्याच्या कोथरूडमधील सुतारदरा परिसरातच हत्या करण्यात आली.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार