Sharad Pawar | वसंत मोरे ‘तुतारी’ हातात घेणार का? शरद पवार स्पष्ट शब्दात म्हणाले…

आगामी निवडणुकांआधी राज्यात राजकीय नेते पक्ष आणि भूमिकाही बदलनाता दिसत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी मनसेला सोडलेल्या वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने मोरेंच्या पक्षप्रवेशांच्या चर्चांणा उधाण आलं आहे. मात्र पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Sharad Pawar | वसंत मोरे तुतारी हातात घेणार का? शरद पवार स्पष्ट शब्दात म्हणाले...
| Updated on: Mar 14, 2024 | 6:12 PM

पुणे | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातील खलबत वाढताना दिसत आहे. लोकसभा निवडणुक तोंडावर असताना पुण्यात वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. मनसेची साथ सोडल्यानंतर वसंत मोरेंना एक दोन नाही तर तीन पक्षांकडून ऑफर असल्याची चर्ची आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून वसंत तात्यांना जाहीर ऑफर आहे. मात्र अद्याप वसंत मोरे यांनी आपली भूमिका जाही केलेली नाही. मात्र आज ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयात गेल्याने पक्षप्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. मोरेंच्या पक्षप्रवेशाबाबत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे सांगितलं आहे.

आमदार निलेश लंकेही आज शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले होते. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं निमित्त होतं. मात्र पत्रकार परिषदमध्ये निलेश लंके यांनी शरद पवारांच्या गटात जाणार की नाही यावर उत्तर देणं टाळलं. त्यामुळे लंके कोणत्या पवारांसोबत याबाबतचा संभ्रम वाढला आहे. त्याआधी वसंत मोरे यांनी कार्यालयात शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी वसंत मोरे यांना पत्रकारांनी पक्षप्रवेशाबद्दल विचारल्यावर त्यांनीही नकार दिला.

शरद पवार काय म्हणाले?

निलेश लंके यांच्या सोबतच्या पत्रकार परिषदेमध्ये पवारांना मोरेंबाबत प्रश्न करण्यात आला. वसंत मोरेंसोबत राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पण मला कोणीही भेटले तर म्हणून खुलासा करत बसू का?, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

वसंत मोरे काय म्हणाले?

माझा पक्षप्रवेश नाही. मी खासदार अमोल कोल्हे आणि शरद पवार यांना भेटायला आलो आहे. शरद पवारांनी बोलावलं म्हणून मी आलो. माझा आज पक्षप्रवेश नाही. निवडणुका लागू द्या. अजून निवडणूक लागलेली नाही. कार्यालयात माणूस भेटण्यासाठीदेखील येतो असं वसंत मोरे म्हणाले.