AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar on Vidyanand Bapat : विद्यानंद बापट बोलतात त्याला अर्थ आहे, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar on Vidyanand Bapat : काल पुण्यात डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar on Vidyanand Bapat : विद्यानंद बापट बोलतात त्याला अर्थ आहे, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar
| Updated on: Sep 04, 2026 | 10:10 AM
Share

पुण्यात काल विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला. पुण्यात वाढत चाललेली डीजे संस्कृती, या दणदणाटाविरोधात ते लढा देत आहेत. टीव्ही 9 मराठीच्या शो मध्ये बोलत असताना अचानक काही तरुण तिथे आले. त्यातल्या एकाने विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याचे तीव्र स्वरुपाचे पडसाद उमटले आहेत. आज शरद पवार या विषयावर बोलले. पण याआधी अन्य राजकीय नेत्यांनी सुद्धा विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.

“विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही.पण विद्यानंद बापट बोलत आहेत त्याला अर्थ आहे. सण, उत्सव लोकांना आनंद देणारे असावेत. डीजेच्या आवाजामुळे त्या सणाचं गांभीर्य निघून जातं. कोणी मत व्यक्त केलं म्हणून त्यांच्यावर हल्ला हे माझ्यामते लोकशाही, मूलभूत अधिकारावर हल्ला आहे” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. “दुसरीगोष्ट पुण्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य सरकारने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अनेकांनी या कृत्याचा निषेध केला. त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. हे थांबायला पाहिजे” असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

कट्टरवादी प्रवृत्ती वाढत आहेत

“पुणे ही चांगुलपणाची प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते. मात्र दुर्दैवाने काही प्रवृत्तींमुळे हे शहर वाईटपणाचीही प्रयोगशाळा बनत असल्याचं चित्र दिसत आहे. समाजातील काही कट्टरवादी प्रवृत्ती वाढत आहेत” असा आरोप कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केला.

मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या

विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव संतोष चव्हाण आहे. पुण्यातील एका गणेश मंडळाचा तो माजी अध्यक्ष आहे. बापट यांना मारहाण करुन संतोष घटनास्थळावरून फरार झाला होता. परंतु पोलिसांनी संतोष चव्हाणचा शोध घेऊन त्याला अटक केली. विद्यानंद बापट यांना मारहाण केल्यानंतर संतोष चव्हाणचा एक व्हिडिओ समोर आला. यात व्हिडिओमध्ये त्याने गणेशोत्सवावर बंधने आल्यास अनेकांच्या घरात चूल पेटणार नसल्याचा दावा केला. “तुला कोणी ऑब्जेकशन घ्यायला सांगितलय. मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या. पुणेकरांबद्दल तुला कोणी..” असं हा हल्लेखोर बापटांवर हल्ला करताना बोलत होता.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी