आज जीआर हाती नाही दिला तर… मांजरीत 600 आदिवासी विद्यार्थ्यांचा अल्टिमेटम, काय दिला इशारा?
Collective Hunger Strike: विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 16 दिवसांपासून त्यांचे पुण्यातील मांजरी येथे उपोषण सुरू आहे. आज या विद्यार्थ्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. काय आहे त्यांचा इशारा?

दिपक कापरे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: पुण्याजवळील मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या 16 दिवसांपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती परवा खालवली होती. मंत्री नरहरी झिरवळ यांनी त्यांना खाऊन-पिऊन उपोषणाचा सल्ला दिल्याने विद्यार्थी नाराज झाले. त्यांच्या आंदोलनाला उलट धार चढली. आज विद्यार्थ्यांनी सरकारला मोठा अल्टिमेटम दिला आहे. आता सामूहिक उपोषणाचा विद्यार्थ्यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारपुढे पेच वाढणार आहे.
तोगडा निघणार कधी?
आता आंदोलन तिसऱ्या आठवड्यात पोहचले आहे. पण आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही मागण्यांबाबत तडजोड होताना दिसली. मंत्री नरहरी झिरवळ, मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांना सबुरीचा सल्ला दिला. पण सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नसल्याची ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या आंदोलनाला नागपूरसह इतर शहरातूनही प्रतिसाद मिळत आहे. या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. आंदोलनकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
600 विद्यार्थ्यांचे सामूहिक आमरण उपोषण
सरकार न्याय मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने आदिवासी विद्यार्थीही ईरेला पेटले आहेत. सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात आणि तोडगा काढवा अशी विनंती त्यांनी केली आहे. आता आंदोलनाचा पुढचा टप्पा विद्यार्थ्यांनी आज जाहीर केला. त्यानुसार, मांजरी येथील 600 विद्यार्थी सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत. त्यांच्या या पावित्र्यानंतर सरकारसमोर पेच वाढला आहे. आज संध्याकाळपर्यंत हे विद्यार्थी सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहणार आहेत. त्यानंतर सर्वांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एका आंदोलकाने दिली.
आज सरकारने जीआर हाती दिला नाही तर 600 विध्यार्थी करणार सामूहिक उपोषण? विध्यार्थ्यांचा सरकारला इशारा दिला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सरकार कडून मागण्या मान्य झाल्याचे म्हटले जात आहे. मागण्यांचा जीआर हातात न मिळाल्याने सोळाव्या दिवशी देखील उपोषण सुरू आहे. सरकारला दिलेली दोन दिवसाची मुदत आज संपली.
काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या?
शहरांच्या मध्यवर्ती भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारावेत
आदिवासी वसतिगृहाबाबत यावर्षी घेतलेला निर्णय रद्द करावा
प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी
विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेतंर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ करावी
2011 मध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी
शिल्लक 12 हजार 500 पदांची भरती करावी
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत द्यावी