AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: अंतरवालीत निर्णायक आंदोलन, सरकारचे शर्थीचे प्रयत्न, मनोज जरांगेंच्या मनधरणीला यश येणार?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचे 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलन सुरू होत आहे. त्यापूर्वी त्यांनी सरकारला त्रुटी दूर करण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. जरांगेंशी बोलणी सुरू असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

Manoj Jarange: अंतरवालीत निर्णायक आंदोलन, सरकारचे शर्थीचे प्रयत्न, मनोज जरांगेंच्या मनधरणीला यश येणार?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 8:03 AM
Share

मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आंदोलनाची हाक दिली आहे. तीन दिवसांपूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण तोडगा निघाला नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराज देसाई, उदय सामंत, आमदार प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीत दाखल झाले होते. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. 28 ऑगस्टपर्यंत त्रुटी दूर करण्याचे आणि कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते. आज सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंतरवाली सराटीत आंदोलनाची तयारी

अंतरवाली सराटीत उपोषणाची तयारी सुरू झाली आहे. मंडप टाकण्याची तयारी सुरू आहे. जरांगे पाटील सरकारशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. उद्या जरांगे पाटील उपोषणाला सुरूवात करणार आहेत. त्यासाठी आता कमी कालावधी उरला आहे. सरकारकडून चर्चेची दारं खुली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिष्टमंडळाने यापूर्वीच अधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपातील दिरंगाबाबत दोषी धरले आहे. पण पुढच्या प्रक्रियेविषयी चर्चेत तोडगा न निघाल्याने वाद कायम आहे. आता सरकार काय पावलं टाकतं याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारने दादागिरी करू नये

आझाद मैदानावर सायंकाळी सहानंतर आंदोलन करता येणार नसल्याने आंदोलकांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. सरकारने दादागिरी करू नये. नाहीतर विमान सेवा, रेल्वेसेवा बंद करू. सर्वच दिशेने मराठे मुंबईत घुसतील. टप्प्याटप्प्याने मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. त्यामुळे अंतरवाली सराटीतील आंदोलन मुंबईत घेऊन जाण्याचाच इशारा त्यांनी दिला आहे.

जरांगेंशी आमची चर्चा सुरु

दरम्यान जरांगे पाटील यांच्याशी आमची चर्चा सुरू असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जरांगे यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही असे आंदोलनाच्या अवघ्या काही तास अगोदर त्यांनी दावा केला. ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार नाही याची काळजी घेत असल्याचे ते म्हणाले. विखे पाटील, आपण, आमदार लाड हे जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती सामंत यांनी दिली.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश