धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की… श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
पुण्यातील वारजे माळवाडी येथे श्रावण महिन्यात दारु पिऊन मांसाहारी जेवणाची मागणी केल्याने वडील आणि मुलात वाद झाला. यातून वडिलांनी मुलाला बेदम मारहाण केली, ज्यात तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडिलांना हत्येच्या आरोपाखाली, तर आईला पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
श्रावण महिन्यात दारू पिऊन मांसाहारी जेवणाची मागणी केल्याने वडिलांनी मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यात पवित्र वातावरण असताना, एका तीस वर्षीय मुलाने दारू पिऊन मांसाहारी जेवणाची मागणी केली. यावरून वडील आणि मुलगा यांच्यात तीव्र स्वरूपाचा वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला जाऊन वडिलांनी संतप्त होऊन मुलाला बेदम मारहाण केली.
या गंभीर मारहाणीत तीस वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, मुलाच्या हत्येच्या आरोपाखाली वडिलांना अटक केली आहे. तसेच, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून मुलाच्या आईलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत. धार्मिक श्रद्धेशी संबंधित एका मागणीवरून झालेल्या कौटुंबिक वादाने इतके गंभीर रूप धारण केल्याने समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published on: Aug 27, 2026 07:51 PM
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं

