ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सच्या पोस्टचा रेफरन्स देऊन प्रतिक्रिया देणं मुख्यमंत्र्यांना शोभणारं नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय. फोटो दाखवायचे झाले तर भाजपच्या नेत्यांसोबतचे हजारो फोटो दाखवू शकतो असं रोहित पवार यांनी म्हटलं. अजूनही वेळ गेलेली नाही, थोडं गांभीर्य दाखवा. दरम्यान रोहित पवार यांच्या ट्वीटला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. रोहित पवार यांनी नेमकं काय ट्वीट केलंय? पाहूया. आयोगाचा […]
ट्रोलर्सच्या पोस्टचा रेफरन्स देऊन प्रतिक्रिया देणं मुख्यमंत्र्यांना शोभणारं नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय. फोटो दाखवायचे झाले तर भाजपच्या नेत्यांसोबतचे हजारो फोटो दाखवू शकतो असं रोहित पवार यांनी म्हटलं. अजूनही वेळ गेलेली नाही, थोडं गांभीर्य दाखवा. दरम्यान रोहित पवार यांच्या ट्वीटला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय.
रोहित पवार यांनी नेमकं काय ट्वीट केलंय? पाहूया.
आयोगाचा पेपर फुटला, एवढी गंभीर आणि संवेदनशील बाब असताना ४० पैसेवाल्या ट्रोलर्स लिहीत असलेल्या पोस्टचा रेफरन्स देऊन… प्रतिक्रिया देत आहात, हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजिबात शोभणारे नाही. भाजपच्या नेत्यांसोबतचे फोटो दाखवू शकतो. अजूनही वेळ गेलेली नाही, थोडे गांभीर्य दाखवा आणि आयोगाच्या अध्यक्षपदी आपण जे आपले जवळचे मित्र बसवलेत… त्यांना आधी पदमुक्त करा आणि स्वच्छ व्यक्ती त्या जागी बसवा.
असं रोहित पवार यांनी एक्सपोस्ट केलीये.
तर त्यावर नवनाथ बन यांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय? पाहूया.
हा शहाणपणा सुरुवात करताना आपल्याला सुचला नाही का? सुरुवात कुणी केली? हे जरा आठवा. कुणी सुरुवात करेल आणि मग कुणी बोलायचे नाही, अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांचे 25 पैसे हरवले म्हटले तर वाईट वाटून घेऊ नका. खरं तर त्या फोटोतून तुम्हाला आरसा दाखवला, आता तुमचा चेहराच खराब असेल तर आरशावर चिडचिड करून काय उपयोग?
असं नवनाथ बन यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय.
Published on: Aug 27, 2026 10:51 PM
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार

