AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...

ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात…

| Updated on: Oct 17, 2026 | 5:11 PM
Share

मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णकर कुटुंबीयांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत गैरसमज निर्माण न करण्याचे आवाहन करत, राजकीय फायद्यासाठी वातावरण बिघडवणाऱ्यांवर टीका केली. आरोपींना भर चौकात शीक्षा देण्याची मागणी करतानाच, प्रदीप पूर्णकरच्या पुतणी खुशबू पूर्णकरलाही मारण्याच्या धमक्या आल्याचे समोर आले.

ठाण्यातील पूर्णकर हत्या प्रकरणानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणावरून काही लोकांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत सरनाईक यांनी ठाकरे सेनेवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत कोणताही गैरसमज निर्माण करून घेऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, ठाणे शहरात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अशा प्रकारचे वातावरण निर्माण केले होते की, जणू हे शहर बिहार किंवा उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांसारखे झाले आहे, ज्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण कलुषित झाले होते.

पूर्णकर कुटुंबीयांना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पूर्णपणे त्यांच्यासोबत आहे. या निर्गुण हत्येतील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी सरनाईक यांनी केली. अशा प्रकारची निर्गुण हत्या त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पहिल्यांदाच पाहिली असून, आरोपींना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, प्रदीप पूर्णकर यांची पुतणी खुशबू पूर्णकरलाही जीवे मारण्याची धमकी आल्याचे तिने सरनाईक यांना सांगितले. ‘प्रदीप पूर्णकरनंतर पुढचे टार्गेट तूच’ अशी धमकी तिला मिळाल्याचा दावा खुशबूने केला आहे.

Published on: Oct 17, 2026 05:11 PM

Follow Us