AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध

मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध

| Updated on: Aug 27, 2026 | 11:03 PM
Share

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इराण युद्धामुळे छत्री वाटपास विलंब झाला. असं अजब उत्तर मुंबई महापालिकेनं दिलं. शाळा सुरू होऊन चार महिने झाले असले तरी महापालिकेनं छत्र्यांसह 27 वस्तूंचं वाटप पूर्ण केलं नसल्याचा आरोप होतोय. पाहूया हा रिपोर्ट. नगर-मनमाड रस्ता ट्रम्पच्या धोरणामुळे रखडल्याचा दावा भाजपचे नेते सुजय विखेंनी केल्यानंतर, आता मुंबई महापालिकेतल्या शालेय मुलांना युद्धामुळे आम्ही छत्र्यांचं […]

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इराण युद्धामुळे छत्री वाटपास विलंब झाला. असं अजब उत्तर मुंबई महापालिकेनं दिलं. शाळा सुरू होऊन चार महिने झाले असले तरी महापालिकेनं छत्र्यांसह 27 वस्तूंचं वाटप पूर्ण केलं नसल्याचा आरोप होतोय. पाहूया हा रिपोर्ट. नगर-मनमाड रस्ता ट्रम्पच्या धोरणामुळे रखडल्याचा दावा भाजपचे नेते सुजय विखेंनी केल्यानंतर, आता मुंबई महापालिकेतल्या शालेय मुलांना युद्धामुळे आम्ही छत्र्यांचं वाटप करू शकलो नाही, असं उत्तर मुंबई महापालिका प्रशासनानं दिलंय. महापालिकेच्या या अजब उत्तरानं सगळ्यांनाच धक्का बसलाय. कारण एकीकडे पावसाळा सुरू होऊन संपत आला, तरी शालेय मुलांना छत्र्यांसह इतर 27 प्रकारच्या वस्तू देण्यात आलेल्या नाहीत. विरोधकांनी यावरून प्रश्न केल्यानंतर त्यांना इराण-अमेरिका युद्धामुळे आम्ही छत्र्या देऊ शकलो नाही, असं अजब कारण महापालिकेनं दिलंय. जूनअखेर आम्ही छत्र्यांसह मुंबई महापालिकेच्या शाळेतील मुलांना शालेय पुस्तकं, वह्या, पेन अशा 27 प्रकारच्या वस्तू देऊ, असा वायदा सत्ताधाऱ्यांनी केला होता. दैनिक लोकसत्ताच्या 21 जुलैच्या बातमीनुसार, शाळा सुरू होऊन महिना लोटला तरी महापालिकेनं दिलेल्या शब्दाची पूर्तता केलेली नाही. तोच खऱ्या अर्थाने आमच्यासाठी एकदम आश्चर्य असणारा प्रश्न आहे की आता युद्ध चालू आहे आणि त्या म्हणजे छत्री मिळवण्यासाठी युद्ध करतायत की युद्ध चालू आहे म्हणून छत्री मिळत नाहीयेत, असा प्रश्न त्या सभागृहामध्ये आम्ही विचारलं की आज आयुक्त नेमकं कोणाला हे कशा पद्धतीचं उत्तर देतायेत? आणि म्हणून अध्यक्षांनी हेच सांगितलं की अजूनही प्रशासन जे आहे ते योग्य उत्तर देण्याच्या मानसिकतेत नाहीये. विरोधकांमध्ये स्वतःमध्ये सुसंवाद नाही. सगळ्यात पहिला महत्त्वाचा म्हणजे. मुळात असं होतं की त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला, त्यावेळी प्रशासनाने त्याच्यावरती असं उत्तर दिलं की त्यांना जो कॉन्ट्रॅक्टरने म्हटलं की आखाती युद्धामुळे मी हा पुरवठा करू शकलो नाही, हे उत्तर कॉन्ट्रॅक्टरने दिलेल्या उत्तरावरती प्रशासनाने सांगितलं. त्यांनी त्यासाठी जो काही उशीर झालाय त्यासाठी फाईन किंवा अदर जे काही नियमावली आहे, दंडात्मक कारवाई, ही सगळी कारवाई प्रशासनाने चालू केलेली आहे. राहिला प्रश्न छत्र्यांचा.

तर भारत गरजेपैकी 90 टक्के पावसाळी छत्र्या चीनमधून आयात करतो आणि 1962 मधील भारत-चीन युद्ध वगळता, त्यानंतर चीनने एकही मोठं युद्ध कोणत्याही देशासोबत केलेलं नाही. विरोधाभास म्हणजे सत्ताधारी पक्षानेच मुंबईतल्या वांद्रेमध्ये 3 ऑगस्टला 10,000 मोफत छत्र्या वाटल्या. मात्र आशियातली सर्वात मोठी महापालिका मात्र युद्ध थांबण्याची वाट बघत बसलीय. दरम्यान, जर मुंबईतल्या शालेय मुलांना छत्री वाटपासाठी जर आपल्याला इतर देशांवरती किंवा कच्च्या मालावरती अवलंबून राहावं लागत असेल, तर मात्र हा चिंतेचा विषय आहे. युद्धाच्या स्पष्टीकरणावरती वाद सुरू झाल्यानंतर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदाराला जबाबदार धरत त्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. असा वेडा माणूस एखाद्या देशाचं नेतृत्व करतो. इराणवर हल्ल्यामुळे क्रूड ऑईल सप्लाय हा आपल्या देशात बंद झाला. त्याचं बाय-प्रॉडक्ट हे डांबर असतं. दुर्दैवाने ऑईल रिफायनरीची क्षमता कमी झाल्यामुळे, क्रूड ऑईल उपलब्ध कमी झाल्यामुळे, डांबर उपलब्धता कमी झाली. तर हे फार मोठं लिंक आहे. पण आता हे कोणाला समजावून सांगणार? म्हणून एकच माणूस कारणीभूत आहे आणि तुम्ही स्वतः या गोष्टीचे साक्षीदार आहात की जो माणूस रात्री एक बोलतो, सकाळी एक बोलतो, परत दुसऱ्या दिवशी एक बोलतो, कधी म्हणतो युद्ध समाप्त झालं, लगेच दुसऱ्या दिवशी मिसाईल टाकून देतो. म्हणजे या सगळ्या कारणामुळे, त्याच्या या गोष्टींवर अनेक आमचे जे काही लोक असतील ते दारू पितात. त्यांच्यावर पण परिणाम झालाय. त्यांची दारू पिण्याची संख्या वाढली. हा म्हणतो की हा येडा काय म्हणतोय आणि काय नाही. आणि तो मिसाईल पडली की लगेच ते प्यायला सुरू करतात. असे पण परिणाम भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. विरोधकांमध्ये स्वतःमध्ये सुसंवाद नाही. सगळ्यात पहिला महत्त्वाचा म्हणजे. मुळात असं होतं की त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला, त्यावेळी प्रशासनाने त्याच्यावरती असं उत्तर दिलं की त्यांना जो कॉन्ट्रॅक्टरने म्हटलं की आखाती युद्धामुळे मी हा पुरवठा करू शकलो नाही, हे उत्तर कॉन्ट्रॅक्टरने दिलेल्या उत्तरावरती प्रशासनाने सांगितलं. त्यांनी त्यासाठी जो काही उशीर झालाय त्यासाठी फाईन किंवा अदर जे काही नियमावली आहे, दंडात्मक कारवाई, ही सगळी कारवाई प्रशासनाने चालू केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी.

Published on: Aug 27, 2026 11:02 PM

Follow Us