AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?

| Updated on: Aug 27, 2026 | 10:36 PM
Share

दिशा सालियान प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणात उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, दिशाच्या वडिलांनी २०२३ पर्यंत दिलेल्या जबाबात कोणताही संशय व्यक्त केला नव्हता. तसेच, २०२० मध्येही त्यांनी हत्या किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त केला नव्हता. हे प्रकरण दिशाच्या कुटुंबासाठी संपायला हवे, […]

दिशा सालियान प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणात उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, दिशाच्या वडिलांनी २०२३ पर्यंत दिलेल्या जबाबात कोणताही संशय व्यक्त केला नव्हता. तसेच, २०२० मध्येही त्यांनी हत्या किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त केला नव्हता. हे प्रकरण दिशाच्या कुटुंबासाठी संपायला हवे, असे आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

मात्र, न्यायालयाने यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. ‘जर कोणताही संशय नव्हता, तर ६ वर्ष चौकशी का करत आहात?’ असा सवाल न्यायालयाने केला. सरकारी वकिलांनी माहिती दिली की, २०२३ मध्ये प्रसारमाध्यमांतील बातम्यांनंतर वडिलांनी सखोल चौकशीची मागणी केली. परंतु, आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यासारखे कोणतेही कारण पोलिसांना मिळाले नव्हते. न्यायालयाने म्हटले की, तुम्ही वडिलांनी संशय का व्यक्त केला नाही असे म्हणता, पण तपासात काय समोर आले तेही तुम्ही त्यांना सांगत नाही. २०२१ चा चौकशी अहवाल उशिराने दिला गेला आणि फेरतपासणी अहवाल आज सादर करण्यात आला, अशी नोंदही न्यायालयाने घेतली. अहवाल पाहूनच संशय व्यक्त करण्याचा अधिकार कुटुंबीयांना असून, ते आजही संशय व्यक्त करू शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Published on: Aug 27, 2026 10:36 PM

Follow Us