AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल घेणं आता खिशाला पडणार जड, जाणून घ्या कोणत्या ब्रँड्सनी वाढवल्या फोनच्या किमती

स्मार्टफोन प्रोडक्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या मेमरी आणि चिप्सच्या किमती सतत वाढत आहेत. तर वाढलेल्या खर्चामुळे स्मार्टफोनच्या किमती वाढत आहेत. चला तर मग कोणत्या स्मार्टफोन ब्रँड्सनी किमती वाढवल्या आहेत ते जाणून घेऊयात.

मोबाईल घेणं आता खिशाला पडणार जड, जाणून घ्या कोणत्या ब्रँड्सनी वाढवल्या फोनच्या किमती
| Edited By: | Updated on: Aug 28, 2026 | 7:51 AM
Share

मेमरी आणि चिपसेटच्या वाढत्या खर्चामुळे उत्पादकांचा नफा कमी होत असल्याने स्मार्टफोनच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे रियलमी, ओप्पो, विवो, सॅमसंग आणि वनप्लसने या निवडक कंपनीच्या मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. ही दरवाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा स्मार्टफोन बाजारात आधीच मंदीचं वातावरण आहे. ग्राहकही फोनवर खर्च करण्यापूर्वी विचार करत आहेत. काउंटरपॉइंट रिसर्चच्या ‘इंडिया वीकली स्मार्टफोन सेलआउट ट्रॅकर’नुसार, एप्रिल ते जुलै 2026 दरम्यान स्मार्टफोनची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिली. मात्र, मोठ्या ऑनलाइन सेलमुळे बाजाराला काही प्रमाणात दिलासा मिळाला.

रियलमी, ओप्पो, व्हिवो, सॅमसंग, वनप्लसने किंमती वाढवल्या

मिळालेल्या माहितीनुसार रियलमीने 18 ऑगस्टपासून अनेक मॉडेल्सच्या किमती 1 हजार ते 4 हजार रूपयांने वाढवल्या आहेत.

त्यासोबतच ओप्पो कंपनीने निवडक रेनो आणि ए-सिरीज फोन्सच्या किमती 5 हजार रूपयांपर्यंत वाढवल्या आहेत,.

तर विवो कंपनीने त्यांच्या काही मॉडेल्सच्या किमती 500 रूपये ते 4 हजार रूपयांने वाढवल्या आहेत.

सॅमसंगने सुद्धा निवडक एस-सिरीज, एम-सिरीज आणि एफ-सिरीज फोन्सच्या किमती वाढवल्या आहेत. गॅलेक्सी एस25 चा एक व्हेरिएंट आता 12 हजार रूपयांनी महाग झाला आहे.

वनप्लसने देखील निवडक स्मार्टफोन्सच्या किमती 2 हजार ते 4 हजार ने वाढवल्या आहेत.

वनप्लस इंडियाच्या एका प्रवक्त्याने टीओआयला सांगितले की, ही अलीकडील दरवाढ उद्योगातील वाढत्या खर्चाच्या दबावाचे, विशेषतः मेमरीच्या वाढत्या खर्चामुळे केली आहे. स्मार्टफोनच्या किमतीत आणखी 7 ते 10 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

आयडीसी एशिया पॅसिफिकच्या डिव्हाइसेस रिसर्च विभागाच्या वरिष्ठ संशोधन व्यवस्थापक, उपासना जोशी म्हणाल्या की, वाढत्या मेमरी खर्चामुळे 2026 च्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरपर्यंत स्मार्टफोनच्या सरासरी किमतीत अंदाजे 15% वाढ झाली आहे. मेमरी आणि घटकांच्या किमतीत सतत होणाऱ्या वाढीमुळे येत्या काही महिन्यांत स्मार्टफोनच्या किमतीत आणखी 7-10% वाढ होण्याची शक्यता आहे.

स्मार्टफोन उत्पादक वाढलेला खर्च ग्राहकांवर लादत असल्याने भाववाढ अटळ होत आहे. नवीन फोनदेखील जास्त किमतीत बाजारात आणले जात आहेत. तर या वाढत्या दरवाढीमुळे ईएमआय आणि फायनान्सिंगचे पर्याय ग्राहकांवरील स्मार्टफोनच्या वाढलेल्या किमतींचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात.

ग्राहक सवलतींची वाट पाहत आहेत

वाढलेल्या किमतींचा परिणाम खरेदीच्या सवयींवर आधीच होत आहे. काउंटरपॉइंटने सांगितले आहे की, एप्रिल ते जुलै या कालावधीत स्मार्टफोनची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी राहिली. जुलैमध्ये ॲमेझॉन प्राइम डे आणि फ्लिपकार्ट GOAT सेल दरम्यान विक्रीत थोडी वाढ झाली, परंतु या सवलती संपल्यानंतर सलग तीन आठवडे विक्रीत घट झाली. या कालावधीत केवळ दोन आठवड्यांत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ दिसून आली आणि ही दोन्ही वाढ मोठ्या सेल इव्हेंट्समुळे झाली होती.

सणासुदीच्या विक्रीमुळे काहीसा दिलासा मिळू शकतो

काउंटरपॉइंटच्या अंदाजानुसार, सणासुदीच्या वेळेस असलेल्या ऑफर्समुळे स्मार्टफोनची मागणी हळूहळू वाढेल, कारण ब्रँड्स सवलती, फायनान्सिंग योजना आणि नवीन उत्पादनाची साथ असते. मात्र परवडण्याजोगे सवलती असणे देखील एक मोठे आव्हान राहील. माहितीच्या अंदाजानुसार वर्षाअखेरीस सणासुदीच्या मागणीमुळे जुने फोन बदलून नवीन फोन खरेदी केले जातील.

Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश