Pune News | आता तंत्रज्ञानामुळे कळणार पायलट थकला, विमानातील त्या घटनेनंतर विमान कंपनीचा निर्णय

Indigo pilot death at airport | नागपूरवरुन पुणे शहरात विमान घेऊन येण्यासाठी पायलट निघाला होता. विमानतळाच्या बोर्डिंग गेटवर तो आला. परंतु गेटवरच बेशुद्ध पडला. त्या प्रकरणानंतर विमान कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Pune News | आता तंत्रज्ञानामुळे कळणार पायलट थकला, विमानातील त्या घटनेनंतर विमान कंपनीचा निर्णय
pilot
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 15, 2023 | 2:45 PM

पुणे | 15 सप्टेंबर 2023 : मोठ्या शहरांमधून विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुणे शहरातून विमान प्रवास करणारे प्रवासी मोठ्या संख्येने वाढले आहेत. आता पुण्यातून देशभरातील अनेक शहरांमध्ये प्रवास करता येत आहे. त्यासाठी पुणे विमानतळावर रन वे सुद्धा तयार केला गेला आहे. आता याच महिन्यात पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे उद्घाटन होणार आहे. परंतु मागील महिन्यात नागपूरवरुन पुणे शहरात येणाऱ्या विमानसंदर्भात एक दुर्घटना घडली होती. त्यानंतर विमान कंपन्यांनी आता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय झाले होते त्या विमानात

नागपूरवरुन पुणे विमान घेऊन पायलट मनोज सुब्रहमण्यम निघणार होते. १८ ऑगस्ट रोजी ते विमानतळाच्या बोर्डिंग गेटवर पोहचले होते. त्या ठिकाणी अचानक खाली कोसळले. अचानक घडलेल्या या प्रकाराने धावपळ उडाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ह्रदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. परंतु विमानात असताना हा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.

विमान कंपनीने घेतला हा निर्णय

पायलट थकला आहे की नाही, हे समजून घेण्यासाठी इंडिगो कंपनीने तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता इंडिगो प्रत्येक पायलटच्या मनगटावर रिस्ट गॅझेट हे उपकरण देणार आहे. त्यामुळे विमान उड्डन करण्यापूर्वी पायलट थकला आहे काय, त्याची शारीरिक क्षमता कशी आहे, यासंदर्भातील माहिती मिळणार आहे. यासाठी इंडिगो कंपनीने फ्रॉन्समधील एअरोस्पेस समूहाच्या थेल्स ग्रुपशी करार केला आहे.

प्रवाशांच्या अन् पायलटच्या सुरक्षेसाठी

विमान कंपनीने म्हटले आहे की, आम्ही आमच्या पायलट आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो. दिल्ली, मुंबई, बंगळुरु आणि चेन्नई विमानतळावर पायलटला पाच मिनिटांच्या तपासणी प्रक्रियेतून जावे लागणार आहे. इंडिगो कंपनीच्या रोज १९०० विमानांचे उड्डन होता. कंपनीकडे चार हजारांपेक्षा जास्त पायलट आहेत. प्रत्येक पायलट रोज चार विमाने टेकऑफ आणि लॅण्डिंग करतो.