AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाव देण्याचा निर्णय, पुण्यात भाजपकडून अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न?

आम्ही कोणालाही डिवचण्याचा प्रयत्न करत नाही. पण, जो इतिहास आहे त्याला बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये. महाराष्ट्रातील १३ कोटी जनता माफ करणार नाही.

उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाव देण्याचा निर्णय, पुण्यात भाजपकडून अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न?
अजित पवार Image Credit source: social media
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jan 13, 2023 | 5:30 PM
Share

पुणे : पुण्यात भाजपकडून अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे. येरवडा येथील उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते. धर्मवीर आहेत आणि धर्मवीर राहतील. या पुलाचं नावदेखील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं ठेवण्यात येणार आहे. या नावाला कोणी विरोध केला तर आम्ही जुमानणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं असलेला हा पूल त्यांना देण्यात आलेली उपाधी कोणी काढू शकत नाही. आनंदाचा क्षण आहे.

उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं उद्धाटन होते. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली.

इतिहास बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये

उद्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाचं उद्घाटन होणार आहे. लोकांना याचा उपयोग होणार आहे. जगदीश मुळीक यांनी सांगितलं की, आम्ही कोणालाही डिवचण्याचा प्रयत्न करत नाही. पण, जो इतिहास आहे त्याला बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये. महाराष्ट्रातील १३ कोटी जनता माफ करणार नाही.

भाजपाकडून अजित पवार यांचा निषेध

अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. त्यांनी जाहीरपणे या विषयाची माफी मागितली पाहिजे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची माफी मागितली पाहिजे.

या विषयावर अजित पवार ठाम आहेत. त्यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वातंत्र्यरक्षक होते, असं म्हटलं. भाजपाने या वक्तव्याचा आधी निषेध केला. आंदोलने केली. आता तर उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं नाव देऊन एकंदरित अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार