ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पंकजा मुंडे यांना खुली ऑफर, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय?

उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचा दरवाजा उघडा आहे. माझीही सूचना आहे की, पंकजा मुंडे यांनी ठाकरे गटात आलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पंकजा मुंडे यांना खुली ऑफर, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय?
पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 4:43 PM

पुणे : मातोश्रीचे दरवाजे खुले असले, तर पंकजा मुंडे (Pankaja Munde) तिकडं जाणार नाहीत. पंकजा मुंडे भाजपा सोडून कुठेही जाणार नाहीत. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हंटलं. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ठाकरे गटानं खुली ऑफरचं दिली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत विश्वास व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मातोश्रीचं दार पंकजा मुंडे यांच्यासाठी खुलं असलं, तरी त्या दाराने त्या कधीचं जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टी हेच त्याचं घरं आहे. त्यामुळं हे मनातले मांडे मनातचं राहणार आहेत. अशाप्रकारचे स्टेटमेंट ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली तरी ती राजकीय स्टेटमेंट राहणार आहेत.

ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पंकजा मुंडे यांना खुली ऑफर देण्यात आली आहे. चंद्रकांत खैरे आणि सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडे यांना खुली ऑफर दिली आहे. आमच्या कन्येवर भाजपात अन्याय होत आहे. असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.पंकजा मुंडे यांचं ठाकरे गटात स्वागतचं असेल, असंही सुनील शिंदे यांनी म्हटलंय.

पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय

चंद्रकातं खैरे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्यावर खरचं अन्याय होत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळं मराठवाडा तसेच महाराष्ट्रात भाजपा मोठ्या प्रमाणात पसरली. सुनील शिंदे हे छोटे आहेत. पण, त्यांचं उद्धव ठाकरे यांच्याशी काहीतरी बोलणं झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचा दरवाजा उघडा आहे. माझीही सूचना आहे की, पंकजा मुंडे यांनी ठाकरे गटात आलं पाहिजे, असंही ते त्यांनी सांगितलं.

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला सलाम

पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यांचं मत आणि क्रिया-प्रतिक्रिया याच्याशी माझं काहीही म्हणणं नाही. पंकजा मुंडे या भाजपाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होतो हे आम्हाला दिसते. ते आणि त्यांचा पक्ष ही त्यांची अंतर्गत बाब आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला आम्ही सलाम करत राहू, असंही ठाकरे गटाच्या नेत्यानं म्हंटलं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.