सगळीकडे तुम्हीच का? कुठं चाललय हे महाआघाडीच राजकारण; का म्हणाले शिवाजीराव आढळराव पाटील असे?

तुम्ही जुन्नर तालुक्यातील धरणाचे पाणी कर्जतला पळविता. तसेच नियोजित बिबट सफारी, शिवसृष्टी बारामतीला पळवुन नेता..! मात्र माझा जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला आता पळवुन नेऊ नका..? असा खोचक सल्ला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. जुन्नर तालुक्यातील डिगोरे येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

सगळीकडे तुम्हीच का? कुठं चाललय हे महाआघाडीच राजकारण; का म्हणाले शिवाजीराव आढळराव पाटील असे?
बिबट्या सफारी प्रकल्पाच्या वादात उडी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 23, 2022 | 3:24 PM

जयवंत शिरतर , पुणे – ‘प्रस्तावित बिबट सफारी , शिवसृष्टी बारामतीला (Baramati ) पळवता या पुणे जिल्ह्यात सगळीकडे तुम्हीच का ? तसेच प्रस्तावित बिबट सफारीबाबत शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे यानी आवाज उठविताच.. तर अशा प्रकारची घोषणाच झाली नाही असही म्हणता. कुठ चाललय हे महाआघाडीच राजकारण. ..! असे म्हणत शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shiv Sena leader Shivajirao Adhalrao Patil) यांनी बारामतीत होऊ पाहणाऱ्या प्रास्तवित बिबट्या सफारी प्रकल्पाच्या (Leopard safari project ) वादात उडी घेतली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असलेलं तरी अनेक जिल्ह्यातील कार्यकर्ते , नेत्यांच्या हे अजून पचनी पडलेले नाही. याचाच एका उदाहरण म्हणजे शिवसेना नेते शिवाजीराव या आढळराव पाटील होय. आढळराव पाटील व राष्ट्रवादी यांच्यातील  आता कुणासाठीही नवीन राहिलेली नाही. मग बैलगाडा शर्यत असो कि आणखी काही अनेकदा आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.

तर झाल असं की

‘प्रस्तावित बिबट सफारी प्रकल्प बारामतीत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितला. त्यानंतर जुन्नर तालुक्यातून या निर्णयाला विरोध करण्यात आला.अनेकांनी यावर आक्षेप घेतला. शिवसेनेचे माजीआमदार शरद सोनवणे यांनीही यानिर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर आता यावादातआढळराव पाटील घुसरल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनाअसा सामना रंगताना दिसून येत आहे.

काय म्हणाले आढळराव

तुम्ही जुन्नर तालुक्यातील धरणाचे पाणी कर्जतला पळविता. तसेच नियोजित बिबट सफारी, शिवसृष्टी बारामतीला पळवुन नेता..! मात्र माझा जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला आता पळवुन नेऊ नका..? असा खोचक सल्ला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. जुन्नर तालुक्यातील डिगोरे येथील कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे काम फक्त लोकांना शब्द द्यावयाचे , नंतर त्याच्याकडून काम करून घ्यावयाचे, मात्र त्याना देताना ऐनवेळेस शब्द फिरवायचे हि राष्ट्रवादीचे नेहमीचेच राजकारण आहे असाही टोला त्यानी लगावला.या कार्यक्रमादरम्यान डिगोरे येथील काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.मात्र खासदार आढळराव पाटलांच्या भाषणाने तालुक्यातील राजकीय राजकारण मात्र ढवळून निघणार हे मात्र निश्चित..!

IPL 2022 साठी स्टेडियममध्ये फॅन्सना मिळणार एन्ट्री, तिकिटं कुठे मिळणार? काय असतील दर? जाणून घ्या सर्व डिटेल्स

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 23 March 2022

Bhandara | रखरखत्या उन्हात 65 वर्षीय महिलेचे उपोषणास्त्र, लाखनी तहसील कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलन