AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट क्लबमध्येच अश्लील चाळे… अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढणार? काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या क्लबमध्ये खुलेआम शेकडो लोकांच्या गर्दीमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे. व्हायरल व्हिडीओ पाहून नागरिक संतप्त. होतेय कारवाईची मागणी.

थेट क्लबमध्येच अश्लील चाळे... अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढणार? काय आहे प्रकरण?
| Updated on: May 19, 2026 | 12:56 PM
Share

Pune Club Viral Video : पुण्यातील मुंढवा परिसरातील प्रसिद्ध ‘बॅस्टियन’ क्लब पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्याशी संबंधित असलेल्या या उच्चभ्रू क्लबमधील एक अश्लील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पुण्यातील पब संस्कृती आणि नाईटलाइफ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मोठ्या आवाजातील संगीत, डान्स फ्लोअरवरील गर्दी आणि मद्यधुंद वातावरण दिसून येत आहे. याच दरम्यान काही तरुण आणि तरुणी क्लबमधील सोफ्यावर बसून सर्वांसमोर अश्लील चाळे करत असल्याचे दृश्य कथितरित्या व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. विशेष म्हणजे क्लबमध्ये त्या वेळी शेकडो लोक उपस्थित असल्याचेही दिसून येत आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत केला जात असून अनेकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे अश्लील वर्तन होत असल्यामुळे नागरिक आणि पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीवर अशा वातावरणाचा चुकीचा परिणाम होऊ शकतो अशी चिंता देखील अनेकांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी

मुंढवा परिसरातील बॅस्टियन क्लब यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा या व्हायरल व्हिडिओमुळे पुण्यातील पब, क्लब आणि नाईटलाइफ संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी पोलिस आणि प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या व्हिडिओची सत्यता आणि तो नेमका कधीचा आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान