AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार गटाचं ठरेना! एकाच जागेसाठी दोन एबी फॉर्म, तनपुरेंनी नाही ऐकलं तर पर्याय कोण? नाव आलं समोर?

राहुरी पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दोन एबी फॉर्म एकाच जागेसाठी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता हे दोन फॉर्म का देण्यात आले? नेमकं काय सुरु आहे जाणून घ्या...

पवार गटाचं ठरेना! एकाच जागेसाठी दोन एबी फॉर्म, तनपुरेंनी नाही ऐकलं तर पर्याय कोण? नाव आलं समोर?
शरद पवारImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 06, 2026 | 1:15 PM
Share

राज्यात बारामती आणि राहुरी या दोन पोटनिवडणुकांसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीत मोठी घडामोड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दोन एबी फॉर्म पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आता हे दोन एबी फॉर्म का पाठवण्यात आले असा प्रश्न पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्राजक्त तनपुरे आणि गोविंदराव मोकाटे यांना हे फॉर्म दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी न स्वीकारल्यास पक्षाचा दुसरा एबी फॉर्म गोविंदराव मोकाटे यांना देण्यात येणार आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवाराचे नाव आज दुपारी २ वाजता घोषित करण्यात येणार आहे.

राहुरी मतदारसंघात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला होता. सध्याच्या पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे पक्षाने पर्यायी उमेदवार म्हणून गोविंदराव मोकाटे यांच्याकडे देखील एबी फॉर्म दिला आहे. गोविंदराव मोकाटे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप उमेदवार अक्षय कर्डिलेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.

राहुरी पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी शरद पवार गटाने दोन पर्याय तयार ठेवले आहेत. प्राजक्त तनपुरे यांनी अपक्ष लढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पक्षाने हे पाऊल उचलल्याचे दिसते. आज दुपारी २ वाजता पक्ष अधिकृत उमेदवार जाहीर करणार असल्याने, राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील इतर पक्षांनाही आपली रणनीती ठरवण्यास मदत होणार आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?