AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रायगडची जागा तटकरेंकडे, नाराज भरत गोगावलेंचंही ते स्वप्न पूर्ण होणार? शिंदेंसोबतच्या बैठकीत काय तोडगा?

रायगडच्या विधानपरिषद जागेचा तिढा अखेर सुटला आहे. या जेगावर सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता भरत गोगावले यांनी पालकमंत्रिपदासाठी जोर लावला आहे.

रायगडची जागा तटकरेंकडे, नाराज भरत गोगावलेंचंही ते स्वप्न पूर्ण होणार? शिंदेंसोबतच्या बैठकीत काय तोडगा?
bharat gogawale and raigad electionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2026 | 8:59 PM
Share

Raigad Vidhan Parishad Election : सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातवरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी पूर्ण ताकद लावली. महायुतीत जागावाटप पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु काही ठिकाणी अन्य मित्रपक्षाला जागा मिळाल्याने तेथील स्थानिक आमदार, नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीत कोकणातील रायगड जागेसाठी तर खूपच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठ शिवसेनेने खूप प्रयत्न केला. परंतु या जागेसाठी खासदार सुनिल तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, आता अनिकेत तटकरे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. हीच नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणातील प्रत्येक आमदाराशी, मंत्र्याशी चर्चा केली आहे. असे असताना आता अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळणार असल्याने आता मंत्री भरत गोगावले हे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार

विधान परिषदेच्या जागा वाटपात महायुतीत रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची नंदनवन निवासस्थानी बैठक घेतली. रायगडची विधानपरिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी रायगडचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले हे आग्रही होते. मात्र जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळे शिवसेनेचे नेत्यांमध्ये असलेला नाराजीचा सूर पाहता एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची समजूत काढत आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये युती धर्म पाळावा अशा सूचनाही या बैठकीतून दिल्या. आम्ही युती धर्म पाळत आहोत आणि त्यानुसार उद्या अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील उपस्थित राहणार आहोत. मात्र सुनील तटकरे यांनीही पुढे युती धर्म पाळावा, असं वक्तव्य कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे. तसेच येणाऱ्या दिवसात रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

आम्ही युतीधर्म पाळणार

विधान परिषदेतील रायगडच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे हे या जागेसाठी इच्छुक होते तर मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगवले यांनी या जागेवरून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन केले जाईल आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो, तरी आता ही जागा राष्ट्रवादीसाठी गेल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणातील सर्व आमदारांनी नेत्यांना युतीधर्म पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. युती धर्म आम्ही देखील पाळणार आहोत आणि उद्या अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचं विकास गोगावले यांनी सांगितले आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा