AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Accident : रायगडमध्ये होंडा सिटी कारने उसाचा रसाच्या गाडीसह पादचारी महिलेला उडवले

पुण्यातील नाना पेठ येथील रहिवासी असलेले विक्रांत विघळूलकर हे माणगाव रोडवरुन आपल्या कुटुंबासोबत होंडा सिटी कारने प्रवास करीत होते. वाहतूक कोंडीमुळे वैतागलेल्या विघळूलकर यांनी टेंबेवाडा समोर समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. याच नादात रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या सकट यांच्या ऊसाचा रस विक्री गाडीला धडक बसून गाडीचा चक्काचूर झाला.

Raigad Accident : रायगडमध्ये होंडा सिटी कारने उसाचा रसाच्या गाडीसह पादचारी महिलेला उडवले
अकोल्यात ट्रॅकच्या धडकेने वृद्धाचा जागीच मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 16, 2022 | 5:08 PM
Share

रायगड : समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना होंडा सिटी कार (Honda City Car)ने उसाच्या रसाच्या गाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघाता (Accident)त पादचारी महिलेला उडवल्याची घटना रायगडमध्ये माणगाव निजामपूर मार्गावर घडली आहे. रितू मोहिते पवार असे जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेवर माणगाव येथील माळी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या अपघाताबाबत माणगाव पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. विक्रांत विघळूलकर असे होंडा सिटी कार चालकाचे नाव आहे. तर अनिल सकट आणि सुगंधा सकट अशी उसाच्या गाडी चालकांची नावे आहेत. वाहतूक कोंडीला कंटाळून समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला. (While overtaking a woman was hit by a Honda City car along with a sugarcane vehicle in Raigad)

होंडा सिटी कारने महिलेला 200 मीटर फरफटत नेले

विकेंड असल्यामुळे माणगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुण्यातील नाना पेठ येथील रहिवासी असलेले विक्रांत विघळूलकर हे माणगाव रोडवरुन आपल्या कुटुंबासोबत होंडा सिटी कारने प्रवास करीत होते. वाहतूक कोंडीमुळे वैतागलेल्या विघळूलकर यांनी टेंबेवाडा समोर समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. याच नादात रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या सकट यांच्या ऊसाचा रस विक्री गाडीला धडक बसून गाडीचा चक्काचूर झाला. याशिवाय रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचारी महिलेलाही धडक देत जवळास 200 मीटर फरफटत नेले. जखमी महिलेला माणगावमधील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या एमएच 12, एमएच 14 पासिंग असणाऱ्या वाहनचाकांकडून बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे पुणे दिघी राष्ट्रीय महामार्गावर अनेक वेळा अपघात घडत असतात. (While overtaking a woman was hit by a Honda City car along with a sugarcane vehicle in Raigad)

इतर बातम्या

Aurangabad | मित्राच्या मदतीने थाटला नवाच उद्योग, भाड्याने कार घ्यायच्या अन् गहाण ठेवायच्या, पुंडलिक नगरात काय प्रकार?

VIDEO : नालासोपाऱ्यात तरुणाला बेदम मारहाण; मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान