Rain Alert: पुढील 24 तास धोक्याचे, ‘या’ 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Rain Alert:  पुढील 24 तास धोक्याचे, या 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता
maharashtra rain update
| Updated on: Jun 15, 2025 | 5:49 PM

राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच राज्याच्या इतर भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या 24 तासांमध्ये राज्यातील हवामान कसे असेल ते सविस्तर जाणून घेऊयात.

या 2 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागात पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी रत्नागिरी, रायगड या 2 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर् जारी केला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

हावामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यातील घाट परिसर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसर, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पावसाचा जोर वाढणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20 जूनपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आहे. तसेच राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

पुढील 24 तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यका आहे. सोलापूर, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील काही भागात आज हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. संभाजीनगर, नांदेड आणि लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरमध्येही पावसाची शक्यता आहे.