जून महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली, जुलैमध्ये सरासरीपेक्षाही जास्त पाऊस, आयएमडीकडून महत्वाचे अपडेट

Monsoon Forecast: यंदा मे महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर जूनच्या सुरुवातीला पावसाने ब्रेक घेतला होता. विदर्भ, मराठवाडा वगळता राज्यातील इतर भागात जून महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. पुणे आणि मुंबईतही पावसाने जून महिन्यातील सरासरी ओलांडली आहे.

जून महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली, जुलैमध्ये सरासरीपेक्षाही जास्त पाऊस, आयएमडीकडून महत्वाचे अपडेट
| Updated on: Jul 01, 2025 | 9:10 AM

Monsoon Forecast: देशात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला. त्यानंतर वेळेपूर्वीच संपूर्ण देशात मान्सून पोहचला. यंदा मे महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. परंतु आता जुलैमधील पावसासंदर्भात हवामान विभागाने महत्वाचे अपडेट दिले आहे. यंदा जुलैमध्येही दमदार पाऊस असणार आहे. देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस जुलै महिन्यात पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

१०६ % पावसाचा अंदाज

जून महिन्यात देशात सरासरी ओलांडणाऱ्या पावसाचा जोर जुलै महिन्यात कायमच राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केली. देशात १०६% पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असल्याने राज्यभर सरासरीपेक्षा अधिक पाऊस शक्यता आहे.

पुणे, मुंबईत सरासरी ओलांडली

यंदा मे महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर जूनच्या सुरुवातीला पावसाने ब्रेक घेतला होता. विदर्भ, मराठवाडा वगळता राज्यातील इतर भागात जून महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. पुणे आणि मुंबईतही पावसाने जून महिन्यातील सरासरी ओलांडली आहे. मुंबईत सरासरीच्या तुलनेत ४९.७ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. जूनमध्ये पुण्यात सरासरी १७३ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा २९ जूनपर्यंत २६३ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला.

चार महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस

राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने मे महिन्यात व्यक्त केला होता. राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. ५ जुलै नंतर राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे. राज्याप्रमाणे देशांत जुलै महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त असणार आहे.