दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, भाजपाच्या नेत्याने थेट म्हटले, तब्बल 6 वर्ष..
दिशा सालियान प्रकरणात सतत आदित्य ठाकरे यांचे नाव येत आहे. पहिल्यांदाच त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी माझा संबंध नसल्याचे म्हटले. त्यावरून आता राम कदम यांनी निशाणा साधला.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. दिशाचे वडील सतीश सालियान यांच्याकडून गंभीर आरोप केले जात आहेत. दिशा सालियान प्रकरणाचा तपास कोर्टाने सीबीआयकडे दिला. हेच नाही तर दिशाच्या वडिलांनी त्यांच्या जबाबात आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचे नाव घेतले. या प्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरेंचे नाव येत आहे. या प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडण्यात आली असून आता सीबीआयमार्फत या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. माझ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला संपवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. या जबाबावरून सीबीआयने गुन्हा दाखल केलाय. परंतु गुन्हा दाखल करताना कोणाचेही नाव घेण्यात आलेले नाही. फक्त जबाबात त्यांचे नाव आहे.
सतत दिशा सालियान प्रकरणात नाव येत असताना आदित्य ठाकरे यांनी तब्बल काही वर्षानंतर यावर प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती, असं सांगत राजकीय हेतूने, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या 6 वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
तब्बल काही वर्षानंतर हे बोलताना आदित्य ठाकरे दिसले. आता यावरूनच राम कदम यांनी जोरदार टीका केली. राम कदम यांनी म्हटले की, दिशा सालियन प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, हे सांगण्यासाठी आदित्य ठाकरे यांना तब्बल साडेसहा वर्षे लागली. ते यापूर्वी गप्प का होते आणि तत्कालीन सरकारने या प्रकरणाची योग्य चौकशी का होऊ दिली नाही
किंवा हे प्रकरण सीबीआयकडे का सोपवले नाही, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. दिशा सालियन यांच्या वडिलांनी वारंवार न्यायाची मागणी केली होती… आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा नव्याने तपास करत आहे… यादरम्यान राम कदम यांनी म्हटले की, तब्बल 6 वर्ष हे बोलण्यासाठी राम कदम यांना कसे लागले.