AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांची भेट होताच घडामोडींना वेग, निलेश लंकेंची भाजपच्या बड्या नेत्यासोबत बंद दाराआड चर्चा; मोठा ट्विस्ट येणार!

Ahmednagar District Cooperative Bank: अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राम शिंदे-निलेश लंके यांच्या बंद दाराआड चर्चेने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

शरद पवारांची भेट होताच घडामोडींना वेग, निलेश लंकेंची भाजपच्या बड्या नेत्यासोबत बंद दाराआड चर्चा; मोठा ट्विस्ट येणार!
| Updated on: Oct 17, 2026 | 5:47 PM
Share

महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सभापती राम शिंदे आणि खासदार निलेश लंके यांच्यात झालेल्या बंद दाराआड चर्चेमुळे बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीमागे नेमकी कोणती राजकीय रणनीती आहे आणि या चर्चेतून काही तोडगा निघणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे निवडणुकीपूर्वी विविध नेत्यांच्या भेटीगाठी आणि संभाव्य जुळवाजुळवीला महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच राम शिंदे आणि निलेश लंके यांच्यात झालेल्या चर्चेमुळे निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना चालना मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खासदार निलेश लंके यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता राम शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. मात्र या दोन्ही भेटींमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली किंवा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत काही ठोस निर्णय झाला आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. यामुळे अंतिम निर्णय लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पॅनलची बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणते गट एकत्र येतात, कोण स्वतंत्रपणे मैदानात उतरतात आणि उमेदवारांबाबत कोणती समीकरणे तयार होतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. राम शिंदे आणि निलेश लंके यांच्या भेटीनंतर बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहमती घडून येणार का, की निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहायला मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. आगामी काळातील नेत्यांच्या बैठका आणि निर्णयांवर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट