AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोने जाळून घेतलं की जाळलं? अनिल परब यांच्या आरोपावर रामदास कदम संतापले; घेतला मोठा निर्णय

Ramdas Kadam on Anil Parab Allegation : रामदास कदम यांनी केलेल्या आरोपानंतर अत्यंत गंभीर आरोप अनिल परब यांनी केली. आता रामदास कदम यांनी थेट अनिल परबांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे स्पष्ट म्हटले.

बायकोने जाळून घेतलं की जाळलं? अनिल परब यांच्या आरोपावर रामदास कदम संतापले; घेतला मोठा निर्णय
Ramdas Kadam
| Updated on: Oct 04, 2025 | 2:28 PM
Share

अनिल परब यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता रामदास कदम यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. फक्त हेच नाही तर मी माझ्या आरोपांवर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले. रामदास कदम यांनी थेट म्हटले की, अनिल परब यांच्याविरोधात माझी पत्नी कोर्टात जाणार आहे. बदनामी करण्याचे काम परबांनी केले आहे. त्यावेळी काय झाले हे अनिल परबांना माहिती आहे का? माझी नार्को टेस्टची तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. त्यातून सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते सांगा.

पुढे रामदास कदम यांनी म्हटले की, माझी पत्नी दोन स्टोव्हवर जेवण बनवत होती. साडीला आग लागली. अन् आगीचा भडका उडाला. मी तिला वाचवलं. माझे हात भाजले. सहा महिने पत्नी अॅडमिट होती. जसलोकमध्ये. मी जसलोकमध्येच होतो. आजही आम्ही जीवाभावने संसार करतोय. तू काय सांगतो. अशा पद्धतीने तू बदनामी केलीय ना..त्यावर मी दावा टाकणार आहे. मी यावर कोर्टात पहिल्यांदा जाणार आहे. मानहानीचा दावा टाकणार आहे.

मुळात म्हणजे बाळासाहेबांचा विषय कोर्टात जावा हे पटत नव्हतं. पण मला आणि डॉक्टरांना खोटं ठरवत असाल तर मला कोर्टात जावं लागेल. मी सीबीआय चौकशीची मागणी करणार. तुला कावीळ झाली. तुला दिसणार नाही. असेही त्यांनी म्हटले. आता बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाबद्दल कोर्टात जाण्याची आपली तयारी असल्याचे म्हणताना रामदास कदम हे दिसले.

अनिल परबांनी रामदास कदम यांच्यावर आरोप करत थेट म्हटले की, 1993 मध्ये रामदास कदम यांच्या पत्नीने जाळून घेतले होते की, त्यांना जाळले होते, याचीही नार्काे टेस्ट केली जावी, आता अनिल परबांच्या आरोपांवर बोलताना रामदास कदम यांनी स्पष्ट म्हटले की, मी नार्काे टेस्ट करण्यासाठी तयार आहे. माझ्या कुटुंबायाची अशी बदनामी केली जात आहे ना… मी थेट आता कोर्टात जाणार आहे. माझी पत्नीच माझ्या अगोदर अनिल परबच्या विरोधात कोर्टात जाईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...