AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस का ठेवली? रामदास कदम यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांचं झटपट उत्तर; म्हणाले, हरामखोराला…

Uddhav Thackeray on Ramdas Kadam allegation : रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले, ज्यानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. नुकताच त्यावर दोन शब्दात उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस का ठेवली? रामदास कदम यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांचं झटपट उत्तर; म्हणाले, हरामखोराला...
Uddhav Thackeray
| Updated on: Oct 04, 2025 | 1:51 PM
Share

रामदास कदम यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा असताना उद्धव ठाकरे यांनी दोन शब्दांमध्ये रामदास कदम यांचा विषय संपवला. बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस का ठेवली? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही, असे म्हणत त्यांनी रामदास कदम यांच्या आरोपांवर थेट भाष्य केले.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकमान्य टिळक प्रश्न विचारू शकतात. तर आपणच निवडून दिलेल्या सरकारला प्रश्न विचारणाचा अधिकार गमावून बसलो आहोत का. गमावून बसलो असू तर आपण पत्रकार म्हणून घेऊ शकतो का. हाच एक प्रश्न आहे. त्यामुळे पत्रकारांनी दूध का दूध आणि पानी का पानी केलं पाहिजे. अंधभक्त जन्माला आले आहेत. त्यांना दृष्टी देण्याचं काम आपण केलं पाहिजे.

राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, 2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो. त्यानंतर एका मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो. आणि रोज उठून आम्ही एकत्र आलो. एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही. 5 जुलैला मेळावा घेतला. एकत्र यायचं नसतं तर मेळाव्यात सोबत आलो नसतो. त्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्यांचा नख लावण्याचा प्रयत्न आहे.

त्या दिवशी राज ठाकरे भाषण करत नव्हते. अजून निवडणूक जाहीर झाली नाही. आमच्या दोन तीन भेटी झाल्या आहेत. काही गोष्टी व्यवस्थित होऊ द्या ना, असेही त्यांनी म्हटले. दसरा मेळाव्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, शिवाजी पार्कात मी भाषण थांबवू का म्हटलं तरी भाषण चालू ठेवा म्हणतात. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणारे हात अधिक आहेत.

आघाडी म्हणून निवडणूक लढवणार का? यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले, हा प्रश्न तिन्ही पक्षाने सोडवला पाहिजे. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. तिन्ही पक्षाने एकत्र लढलं पाहिजे. तिन्ही पक्षांना वाटलं एकत्र लढायचं तर लढू शकतो. पण कुणाला वाटलं स्वतंत्र लढायचं तर तसं होऊ शकतं. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांच्या भावनाही समजून घेऊ.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...